हैदराबाद, 04 ऑक्टोबर : असे काही लोक आहेत जे सर्रासपणे वाहतूक नियमांचं उल्लंघन करतात. वाहतूक पोलिसांनी पकडल्यानंतर काही जण त्यांच्याशी हुज्जतही घालतात. पण एका बाईकस्वाराने वाहतूक पोलिसांनी अडवल्यानंतर असं काही केलं की सर्वांना धक्का बसला आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या या बाईकस्वार तरुणाने रागात धक्कादायक पाऊल उचललं. तेलंगणाच्या हैदराबादमधील हे प्रकरण आहे. ज्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मीरपेटच्या मैत्रीवनमध्ये संध्याकाळी एक व्यक्ती तिथंच असलेल्या आपल्या मोबाईल फोनच्या दुकानात आली. ही व्यक्ती रस्त्याच्या विरुद्ध दिशेने गाडी चालवत होती. हे वाहतूक नियमांचं उल्लंघन आहे. त्यामुळे एका ट्रॅफिक पोलिसांनी त्याला थांबवलं. ती व्यक्ती संतप्त झाली तिने मारहाण सुरू केली. इतकंच नव्हे तर तिचा राग इतका अनावर झाला की ती आपल्या दुकानात गेली. तिथून इंधनाची बाटली आणली आणि ती आपल्या बाईकवर टाकली. त्यानंतर त्याने बाईकला आग लावली. हे वाचा - 11 लाखांच्या गाडीच्या दुरुस्तीचे बिल तब्बल 22 लाख रूपये! वाचा काय आहे प्रकार? एस अशोक असं या व्यक्तीचं नाव असल्याचं सांगितलं जातं आहे. ट्रॅफिक पोलिसांनी तात्काळ तिथल्या स्थानिक पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. पोलीस तिथं लगेच आले आणि त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं.
प्रसारमाध्यमांशी बोलताना पोलिसांनी सांगितलं की, एक दुचाकी विरुद्ध दिशेने येत असल्याचं ट्रॅफिक पोलिसांनी पाहिलं आणि या गाडीला रोखलं. त्यानंतर दुचाकीस्वार तिथं असलेल्या आपल्या दुकानात गेला आणि पेट्रोलची बाटली घेऊन बाहेर आला. त्याने पेट्रोल आपल्या गाडीवर टाकून गाडी पेटवली.
రాంగ్ రూట్ లో వచ్చాడు. ట్రాఫిక్ పోలీసులు ఆపారు. పోలీసులు అపినందుకు కోపం వచ్చింది. తన బైక్ లోని పెట్రోల్ తీసి బండి నీ తగల పెట్టారు. అదేమని అడిగితే పోలీసుల మీదకు తిరగ పడ్డారు. పోలీస్ లు అశోక్ ను అదుపులోకి తీసుకున్నారు. @CPHydCity @HYDTP #traffic pic.twitter.com/uhTjNmx1U7
— RameshVaitla (@RameshVaitla) October 3, 2022
@RameshVaitla ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आपल्याला पोलिसांचा राग आल्याचं त्याने सांगितलं. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सर्वांना माहिती असावेत असे वाहतुकीचे सामान्य नियम वाहन चालकाने वेग मर्यादेचं उल्लंघन करू नये. भार क्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक करू नये. वाहतूक चिन्हांचे आणि संकेतांचे उल्लंघन करू नये. वाहन चालवताना योग्य इशाऱ्यांचा वापर करावा. वाहन धोकादायक स्थितीत उभे करून ठेऊ नये. वाहनाच्या बाहेरील भागावर बसून प्रवाशांची वाहतूक करू नये. हे वाचा - #कायद्याचंबोला: गाडीची चावी काढणं दूरच, ट्रॅफीक पोलीस पावतीही फाडू शकत नाहीत; तुम्हालाही आहेत हे अधिकार चालकास अडथळा होईल अशा ठिकाणी प्रवासी किंवा एखादी वस्तू ठेऊ नये. योग्य ती काळजी घेतल्याशिवाय कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वाहन उभे करू नये. हेल्फट न घालता दुचाकी चालवू नये. रस्त्यावर वाहन तपासणीच्या वेळी वाहनाची संबंधित सर्व प्रमाणपत्रे सादर करणं. गणवेशधारी अधिकाऱ्याने थांबण्याचा इशारा दिल्यानंतर वाहन थांबवणं. दारू किंवा अंमली पदार्थांच्या नशेत वाहन चालवू नये. मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या अपात्र असताना वाहन चालवू नये. गाडी चालवताना मोबाईल फोनचा वापर करू नये.