मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

#कायद्याचंबोला: गाडीची चावी काढणं दूरच, ट्रॅफीक पोलीस पावतीही फाडू शकत नाहीत; तुम्हालाही आहेत हे अधिकार

#कायद्याचंबोला: गाडीची चावी काढणं दूरच, ट्रॅफीक पोलीस पावतीही फाडू शकत नाहीत; तुम्हालाही आहेत हे अधिकार

हे नियम माहीत असतील तर ट्रॅफीक पोलीस कधीच फाडणार नाही पावती

हे नियम माहीत असतील तर ट्रॅफीक पोलीस कधीच फाडणार नाही पावती

प्रत्येक वाहन चालकाचा कधी ना कधी ट्रॅफीक पोलिसांशी सामना होतोच. अशावेळी तुम्हाला काही कायदे माहीत असतील तर तुमच्यासोबत कोणताही अधिकारी चुकीचं वागू शकणार नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

संदिप आज सकाळपासूनच गडबडीत होता. त्याला निघण्याची घाई होती. कारणंही तसच होतं. त्याच्या जीवलग मित्राचं लग्न होतं. आईने चहा घेऊन जा रे.. असं म्हणत असतानाच संदिपने गाडीला किक मारली. गाडी सजवण्यापासून नवरदेव मंडपात नेण्याची जबाबदारी त्याच्यावर तर होती. विवाहस्थळी पोहचल्यावर पहिल्यांदा काय करायचं? नंतर कसं नियोजन असणार असा मनात विचार सुरू असतानाच चौकात ट्रॅफीक पोलिसांनी हात दाखवला. अरे यार.. असा विचार करतच त्याने गाडी बाजूला घेतली. पोलिसांनी त्याला लायसन्स मागितलं. यानेतर शर्टाच्या बाह्यांचं बटनही लावलं नव्हतं. त्यामुळे आठवणीने लायसन्स आणायचा विषयच नव्हता. पण, संदिप टेक्नोसेवी असल्याने त्याने मोबाईल काढत डिजीलॉकरवर डॉक्युमेंट दाखवत स्वतःची सुटका केली. पण, प्रत्येकाचं नशीब इतकं चांगलं नसतं.

कुणाची फसवणूक, कुणाचा छळ, कुणाला मानसिक त्रास, कुणाच्या वैयक्तित आयुष्यात ढवळाढवळ, कुणाच्या हक्कांवर गदा, प्रॉपर्टीचे वाद, कौटुंबिक कलह.. कुठल्याही विषयासंदर्भात कायदा काय सांगतो? शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, पण अनेकांनी ती चढून आपला हक्क मिळवला आहे. या कायद्याच्या गोष्टी सोप्या करून सांगणारी नवी सीरिज #कायद्याचंबोला. कायद्याच्या अभ्यासक वकिलांकडूनच तुम्हाला मिळेल अगदी खात्रीशीर माहिती. तुम्हालाही कुठल्या विषयी कायदेशीर शंका असतील तर Rahul.Punde@nw18.com या मेलवर आम्हाला सांगा.


अनेकदा ट्रॅफिक पोलीस गाडीची चावी काढून घेतात, लायसन्स जप्त केलं जातं. गाडीवर बसलेले असतानाही गाडी उचलली गेल्याची घटना तुम्ही पाहिली असेल. अशा परिस्थितीत आपले अधिकार काय आहेत? ट्रॅफिक पोलिसांना कोणत्या मर्यादा असतात? जर तुमच्यासोबत चुकीची गोष्ट घडली तर कुठे तक्रार करायची? अशा गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे.

वाहन चालवताना तुमच्याकडे कोणती कागदपत्रे असावी?

जर ट्रॅफिक पोलिसांनी तुम्हाला थांबवले तर ते ड्रायव्हिंग लायसन्स दाखवण्यास सांगू शकतात. त्यामुळे सर्व कागदपत्रे तुमच्या कारमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, आता सरकारी Digi Locker या मोबाईल अ‍ॅपमध्येही तुम्ही डॉक्युमेंट डाउनलोड करुन दाखवू शकता.

  1. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजे आरसी
  2. पॉलुशन अंडर कण्ट्रोल सर्टिफिकेट
  3. ड्रायव्हिंग लायसन्स (DL)
  4. वाहन इन्शुरन्स पॉलिसी

ट्रॅफिक पोलिसांनी थांबवल्यावर तुमचे अधिकार काय आहेत?

आयडेंटीटी: तुम्हाला थांबवणाऱ्या ट्रॅफिक पोलिसाची ओळख विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे. तुम्ही त्यांचा बकल नंबर किंवा नाव लिहून ठेवू शकता आणि बकल नसल्यास त्यांना त्यांचे ओळखपत्र विचारू शकता. जर ट्रॅफिक पोलीस कर्मचारी त्यांची ओळख लपवत असल्यास तुम्ही त्यांना तुमची कागदपत्रे सादर करण्यास नकार देऊ शकता.

ड्रायव्हिंग लायसन्स : मोटार वाहन कायद्याच्या कलम 130 नुसार जेव्हा पोलीस अधिकारी तुम्हाला कागदपत्रे विचारतील तेव्हा तुम्ही फक्त ड्रायव्हिंग लायसन्स सादर करणे आवश्यक आहे. उर्वरित कागदपत्रे सोपवण्याचा पर्याय पूर्णपणे तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे.

ड्रायव्हिंग लायसन्सच्या जप्तीविरुद्ध पावती : जर पोलीस अधिकाऱ्याने तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स जप्त केलं तर तुम्हाला तुमच्या परवान्याविरुद्ध ट्रॅफिक पोलिस विभागाने जारी केलेली वैध पावती दिली असल्याची खात्री करा.

वाचा - #कायद्याचंबोला: गॅस व्हेरिफिकेशनच्या नावाखाली तुमची फसवणूक तर झाली नाही ना? असा शिकवा एजन्सीला धडा

कारमध्ये कोणी बसले असल्यास टो करू शकत नाही : जर कोणी कारमध्ये बसले असेल तर वाहतूक पोलीस तुमची कार टो करू शकत नाहीत. जोपर्यंत कोणीतरी गाडीच्या आत बसले आहे तोपर्यंत तो टो करता येत नाही.

पोलिसांच्या अरेरावी विरोधात तक्रार नोंदवा: जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला योग्य वागणूक दिली गेली नाही किंवा ट्रॅफिक पोलिसांकडून तुमचा छळ होत असेल तर तुम्ही या घटनेची तक्रार ऑनलाइन किंवा तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये करू शकता.

चलन बुक किंवा ई-चलान जनरेटर: ट्रॅफिक पोलीस केवळ सरकारकडून जारी केलेले चालान बुक किंवा ई-चलान मशीन असतानाच चलन जारी करू शकतात. घटनास्थळी असलेला पोलीस अधिकारी उपनिरीक्षक किंवा त्याहून अधिक दर्जाचा असेल तर तुम्ही घटनास्थळीच चलन भरू शकता.

तुम्हाला जबरदस्तीने वाहनातून उतरवू शकत नाही: भारतीय मोटार वाहन कायदा 1932 अंतर्गत कोणताही पोलीस अधिकारी तुम्हाला कधीही वाहनातून बाहेर काढू शकत नाही किंवा तुमच्या गाडीची चावी काढून घेऊ शकत नाही. एवढेच नाही तर ते तुमच्या कारच्या टायरची हवाही काढू शकत नाहीत. (कायदे वेळोवेळी बदलत असतात. वरील माहिती ही सध्याच्या कायद्यानुसार आहे. त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई करण्याअगोदर कायदेतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

(लेखिका कायद्याच्या अभ्यासक असून पुण्यात कायदेशीर सल्लागार आणि पुणे जिल्हा न्यायालयात वकील म्हणूनही कार्यरत आहेत.)

First published:

Tags: Legal, Traffic department, Traffic police