मराठी बातम्या /बातम्या /Viral /

11 लाखांच्या गाडीच्या दुरुस्तीचे बिल तब्बल 22 लाख रूपये! वाचा काय आहे प्रकार?

11 लाखांच्या गाडीच्या दुरुस्तीचे बिल तब्बल 22 लाख रूपये! वाचा काय आहे प्रकार?

नुकताच बंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस झाला.

नुकताच बंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस झाला.

नुकताच बंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस झाला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bangalore Rural, India
  • Published by:  News18 Desk

एका व्यक्तीने सोशल मीडियावर त्याच्यासोबत घडलेल्या विचित्र घटनेचा उल्लेख केला. हे कळल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्या व्यक्तीने सांगितले की, त्याला 22 लाख रुपयांचे कार रिपेअरिंग बिल आले आहे. तर कारची मूळ किंमत केवळ 11 लाख रुपये होती. मात्र, नंतर कंपनीने या प्रकरणाची दखल घेत त्या व्यक्तीला दिलासा दिला आहे.

बंगळुरूचा रहिवासी असलेल्या अनिरुद्ध गणेश नावाच्या व्यक्तीने लिंक्डइनवर पोस्ट केली, त्याने त्याची फोक्सवॅगन कार दुरुस्तीसाठी एका दुरुस्ती केंद्रात पाठवली होती. या कारची किंमत 11 लाख रुपये होती. परंतु कार दुरुस्ती केंद्राने त्याला 22 लाखांचे बिल दिले. त्यानंतर रिपेअरिंग बिल भरायचे की, रिपेअरिंग सेंटरमध्येच गाडी सोडायची हे समजत नव्हते. लिंक्डइन प्रोफाइलनुसार, अनिरुद्ध अॅमेझॉनमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत आहे.

पावसामुळे कारचे नुकसान झाले -

नुकताच बंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस झाला. या पावसात अनिरुद्ध गणेशच्या फोक्सवॅगन पोलो हॅचबॅक कारचे नुकसान झाले. अशा परिस्थितीत त्यांनी व्हाईटफिल्ड परिसरात असलेल्या फोक्सवॅगनच्या दुरुस्ती केंद्रात दुरुस्तीसाठी आपली कार पाठवली.

हेही वाचा - लग्नात पाहुण्याचं असं कृत्य की, वधू-वरांनी व्हिडीओ पाठवून मागितली नुकसान भरपाई

त्याच्या कारची किंमत 11 लाख आहे. मात्र, 20 दिवसांनी कार दुरुस्त केल्यानंतर दुरुस्ती केंद्राने त्याला 22 लाखांचे बिल दिले. हे पाहून अनिरुद्धला धक्काच बसला. अनिरुद्धने या संपूर्ण घडामोडीबाबत फोक्सवॅगन व्यवस्थापनाला ई-मेलद्वारे माहिती दिली. कंपनीने त्यांची अडचण लक्षात घेऊन 5000 रुपयांचे बिल सेटल केले. आता अनिरुद्धची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

First published:

Tags: Banglore, Car