मराठी बातम्या /बातम्या /Viral /

नाकाबंदीत सगळ्यात आधी 'या' बाईक्स थांबवतात पोलीस, ही माहिती तुमच्या कामाची

नाकाबंदीत सगळ्यात आधी 'या' बाईक्स थांबवतात पोलीस, ही माहिती तुमच्या कामाची

प्रतिकात्मक फोटो, सोर्स : गुगल

प्रतिकात्मक फोटो, सोर्स : गुगल

Traffic Police काय बघून बाईक चालकांना थांबवता? तुम्हाला देखील असा प्रश्न पडला असेल, तर ही माहिती वाहन चालकाच्या कामाची

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 16 ऑक्टोबर : गाडी चालवताना वाहातूकीचे नियम पाळणं बंधनकारक आहे. हे नियम खरंतर आपल्या सगळ्यांची सेफ्टी लक्षात घेऊन बनवले गेले असतात. त्यामुळे सुजान नागरिक म्हणून ते पाळणं आपलं कर्तव्य आहे. पण आपल्यापैकी कोणाही नियम मोडले तर ट्राफिक पोलीस आपल्याला पकडतात आणि संबंधीत दंड आपल्यावर लावला जातो.

तुम्ही बर्याचदा हे पाहिलं असेल की ट्राफिक पोलीस हे रस्त्यावर नाकाबंदी करतात आणि काही ठरावी लोकांना पकडतात. तर काही लोकांना ते जाऊ देतात. पण तुम्ही कधी अशा विचार केला आहे का की पोलीस काही ठरावीक लोकांना का थांबवतात? किंवा पोलीस कोणती गोष्ट पाहून वाहन चालकांना थांबवतात?

तर चला आज आम्ही तुम्हाला अशा वाहनांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे चलन सर्वप्रथम वाहतूक पोलिस कापतात.

मॉडिफाय बाइक्स

अनेक लोकांना असं वाटत असतं की आपली गाडी सगळ्यांपेक्षी वेगळी असावी. ज्यामुळे ते गाडीला मॉडिफाय करुन घेतात. सध्या तर तरुणांमध्ये मॉडिफाय गाडी वापरण्याचा ट्रेंडच आला आहे. परंतू अनेकांना हे माहित नसते की, दुचाकीमध्ये बदल करणे म्हणजे वाहतून नियमांचे नियमांचे उल्लंघन आहे. ज्यामुळे पोलीस देखील अशा वाहनांना सगळ्यात आधी थांबवतात.

हे ही वाचा : Video : पानपट्टीच्या दुकानातील बल्बची चोरी, सीसीटीव्ही पाहाताच पानवाल्यालाही बसला धक्का

फॅन्सी नंबर प्लेट

मोटार वाहन कायद्यानुसार वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावणे बेकायदेशीर आहे. अशा नंबरप्लेट लावणाऱ्यांविरुद्ध वाहतूक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात चलन कापले जात आहे. म्हणून, RTO प्रमाणित नंबर प्लेट वापरा आणि नंबर प्लेट्सशी छेडछाड टाळा.

तुमच्या गाडीवरील नंबर स्पष्ट दिसतील आणि वाचता येतील अशीच असवी याची काळजी घ्या. नाहीतर पोलीस तुम्हाला नक्कीच थांबवणार.

सायलेन्सर

मोटारसायकलचा आवाज थोडा वेगळा करण्यासाठी अनेकदा लोक बाईकच्या लिलान्सरमध्ये बदल करून घेतात, जे बऱ्याचदा ऐकायला कर्कश असतात. ज्यामुळे एखाद्या गाडीच्या सयलेन्सरचा आवाज ऐकून देखील वाहतूक पोलीस सक्रिय होतात.

त्यामुळे तुम्ही देखील गाडीला असा वेगळ्या आणि मोठ्या आवाजाचा सायलेन्सर लावला असेल तर पोलीस तुम्हाला देखील पकडू शकतात.

Railway Facts : ट्रेनच्या मागील बाजूला 'X' चिन्ह का असते?

जुनी गाडी

जर तुमची गाडी जुनी किंवा रंग गेलेली आढळली तरी देखील पोलीस तुम्हाला पकडू शकतात. बऱ्याचदा जुन्या गाड्याची पीयुसी निघत नाही तरी देखील लोक त्याला वापरतात. तसेच काही लोक गाडी जुनी आहे, म्हणून त्याचे पेपर्स काढत नाहीत. यामुळे पोलीस शक्यतो अशा गाड्यांना थांबवतात.

वरील दिलेली माहिती ही सामान्य माहितीवर आधारीत आहे. या व्यतिरिक्त इतर कारणांसाठी देखील वाहन चालकांना पोलिसांकडून पकडले जाऊ शकते.

First published:

Tags: Marathi news, Traffic police, Traffic Rules, Viral