मुंबई : सध्या रातोरात प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काय काय करतील याचा काही नेम नाही. स्टंटसाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
तरुण स्टंट करता करता अक्षरश: रस्त्यावर झोपला आहे. त्याचा हा थरारक स्टंट पाहून अंगावर काटा येईल. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तरुण स्टंट करता करता अक्षरश: रस्त्यावर झोपला आहे. त्याचा हा थरारक स्टंट पाहून अंगावर काटा येईल. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या फोटोमध्ये पाहू शकता तरुणाने 90 अंश कोनात बाईकचा स्टंट करून हा व्यक्ती खाली झोपला आहे. त्यानंतर त्याने पुन्हा स्वत:ला सावरुन बाईक चालवली आहे.
हा स्टंट पाहून युजर्सला अक्षरश: घाम फुटायची वेळ आली. असे जीवघेणे स्टंट धोक्याचे ठरू शकतात. त्यामुळे असे व्हिडीओ पाहून तुम्ही स्टंट करू नका.
bike_my_life_94 नावाच्या इन्स्टा युजरने व्हिडीओ शेअर केला आहे. हा स्टंट करताना या व्यक्तीची पाठ रस्त्याला घासते आणि आगीसारख्या ठिणग्या येतात ते देखील या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर खूप लाईक्स मिळाले आहेत.