जाहिरात
मराठी बातम्या / Viral / गाडी चालवत असतानाच दुचाकीस्वाराच्या डोक्यावर पडला झाडावरील नारळ; पुढे भयानक घडलं, VIDEO

गाडी चालवत असतानाच दुचाकीस्वाराच्या डोक्यावर पडला झाडावरील नारळ; पुढे भयानक घडलं, VIDEO

दुचाकीस्वाराच्या डोक्यावर पडला झाडावरील नारळ

दुचाकीस्वाराच्या डोक्यावर पडला झाडावरील नारळ

रस्त्याच्या कडेला असलेल्या नारळाच्या झाडावरून एक नारळ तुटून त्याच्या डोक्यावर पडतो. त्यामुळे दुचाकीस्वार जखमी होऊन त्याचं नियंत्रण सुटून अपघात होतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 18 मे : जवळपास दररोज सोशल मीडियावर रस्ते अपघातांचे अनेक धक्कादायक व्हिडिओ पाहायला मिळतात. बहुतांश अपघातांमध्ये बेजबाबदारपणे वाहन चालवल्यामुळे अनेकजण अपघातात जखमी होताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असं दिसून येतं, की काही प्रकरणांमध्ये नैसर्गिक कारणांमुळेही अपघात होऊ शकतात. हे टाळण्यासाठी आपण वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे. बापरे! जिवंत माणसाच्या शरीराला लावली आग; मसाजचा हा प्रकार पाहून धडकीच भरेल, Video सर्वसाधारणपणे रस्त्यावर चालण्यासाठी अनेक प्रकारचे नियम आहेत. ज्यामध्ये रस्त्यावर दुचाकी चालवणाऱ्या लोकांना अपघात झाल्यास डोके सुरक्षित ठेवण्यासाठी हेल्मेट घालण्याचा सल्ला दिला जातो. सध्या कोणत्याही रस्त्यावरील अपघातातून दुचाकीस्वाराने स्वत:चा बचाव करण्यासाठी हेल्मेट घालणे अत्यंत गरजेचे आहे. नुकताच समोर आलेला व्हिडिओ पाहून हेल्मेट आपल्याला अपघातापासून कसे वाचवू शकते हे समजू शकतं.

जाहिरात

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक दुचाकीस्वार दिसतो, जो रस्त्यावरून चालत असताना समोरून येणाऱ्या वाहनांचा व्हिडिओ बनवत आहे. अचानक एक दुचाकीस्वार त्याच्यापर्यंत पोहोचतो, त्याचवेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या नारळाच्या झाडावरून एक नारळ तुटून त्याच्या डोक्यावर पडतो. त्यामुळे दुचाकीस्वार जखमी होऊन त्याचं नियंत्रण सुटून अपघात होतो. दुचाकीस्वार डोक्यावर हेल्मेट न घातल्याने अपघाताला बळी पडत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. बातमी देईपर्यंत, सोशल मीडियावर 2 लाख 20 हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे आणि 4.6 दशलक्षांहून अधिक म्हणजेच सुमारे 46 लाख वापरकर्त्यांनी तो पाहिला आहे. व्हिडिओ पाहून यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. कमेंट करताना अनेक युजर्सनी लिहिलं की, रस्त्यावर दुचाकी चालवताना हेल्मेट घालणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात