Home /News /viral /

मिझोराममधील या Viral Photo चं जगभरात होतंय कौतुक; यात असं नेमकं काय आहे?

मिझोराममधील या Viral Photo चं जगभरात होतंय कौतुक; यात असं नेमकं काय आहे?

आनंद महिंद्रांनी जो फोटो रिट्विट केला आहे त्यात दिसतं की जाममध्ये अडकले असूनही लोक आपल्या लेनमध्येच गाड्या घेऊन उभा आहेत. तिथे डिव्हायडरही नाही आणि दुसऱ्या बाजूचा रोड पूर्णपणे रिकामा आहे

  नवी दिल्ली 02 मार्च : आपण सगळेच कधी ना कधी ट्राफिक जाममध्ये अडकतोच. आपण अनेकदा पाहिलं असेल की लोक ट्राफिक जाममध्ये अडकल्यानंतर अगदी काहीही करून आपली गाडी पुढे घेण्याचा प्रयत्न करत राहातात. यादरम्यान आपल्याला सतत हॉर्नचे आवाज ऐकून येतात. अनेक लोक तर यादरम्यान सिग्नल तोडून पुढे निघूनही जातात. मात्र आता असा फोटो समोर आला आहे (Mizoram Traffic Jam Photo), ज्याचं संपूर्ण जगभरातील लोक कौतुक करत आहेत. भलेभले शोधून थकले पाहा तुम्हाला सापडतोय का या फोटोत दडलेला बिबट्या हा फोटो मिझोराममधील आहे. हा फोटो इतका खास आहे की महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनीबी स्वतः तो शेअर केला आहे. हा फोटो (Traffic Discipline Viral Photo) मिझोराममध्ये झालेल्या वाहतूक कोंडीचा आहे. हा फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, की शिस्त आणि ट्राफिक नियमांचं पालन करणं मिझोरामच्या लोकांकडून शिकावं. आनंद महिंद्रांनी जो फोटो रिट्विट केला आहे त्यात दिसतं की जाममध्ये अडकले असूनही लोक आपल्या लेनमध्येच गाड्या घेऊन उभा आहेत. तिथे डिव्हायडरही नाही आणि दुसऱ्या बाजूचा रोड पूर्णपणे रिकामा आहे. मात्र तरीही लोक नियम न तोडता अगदी शांततेत सिग्नल वाहतूक कोंडी संपण्याची वाट बघत आहेत. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की अर्धा रस्ता अगदी रिकामा आहे. तरीही लोक रस्त्यावरील रेषेच्या आतमध्ये उभा आहेत आणि ती लाईनही क्रॉस करत नाहीत.

  2 वाघिणींच्या लढाईत बिबट्या लटकला; मध्यस्थी करायला जाताच...; पुढे काय घडलं पाहा

  आनंद महिंद्रा यांनी हा फोटो रिट्विट करत लिहिलं, 'अतिशय सुंदर फोटो...एकही गाडी रोज मार्करच्या बाहेर नाही. हे प्रेरणादायक आहे. हा फोटो एक अतिशय चांगला संदेशही देतो. हे आपल्याला असतं की आपल्याला आपल्या आयुष्याच्या गुणवत्तेत कशी सुधारणा करायची आहे. नियमांचं पालन करा. मिझोरामचे लोक खरंच कौतुकास पात्र आहेत'. सगळ्यात आधी हा फोटो संदीप अहलावत नावाच्या ट्विटर यूजरने पोस्ट केला होता.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Traffic Rules, Viral photo

  पुढील बातम्या