मुंबई, 02 मार्च : बऱ्याच वेळा आपल्याला दिसतं तसं नसतं किंवा अनेकदा आपल्या समोर असूनही आपल्याला बरंच काही दिसत नाही. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक बिबट्या दडला आहे. पण तो सहजासहजी कुणाला दिसत नाही आहे. या फोटोतून बिबट्या शोधण्याचा प्रयत्न बऱ्याच लोकांनी केला. पण भलेभले फेल झाले आहेत. आता तुम्हाला हा बिबट्या सापडतो आहे का पाहा.
एका वाइल्डलाइफ फोटोग्राफर्सने (Wildlife Photographers) काढलेले बिबट्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बर्फाळ प्रदेशातील हा फोटो आहे. बर्फाच्छादित डोंगरावर काही बिबट्या आहेत. फोटोग्राफरने आपल्या सोशल मीडियावर आपले हे फोटो पोस्ट केले आहेत. काही फोटोत बिबट्या पटकन दिसत नाही आहेत आणि त्याच बिबट्याला लोक शोधत आहेत.
हे वाचा - 2 वाघिणींच्या लढाईत बिबट्या लटकला; मध्यस्थी करायला जाताच...; पुढे काय घडलं पाहा
फोटोग्राफर सौरभ देसाईच्या @saurabh_desai_photography या इन्टाग्रामवर अकाऊंटवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये पहिल्या फोटोत उंच असा बर्फाने झाकलेला डोंगर दिसत आहे. ज्यामध्ये एक बिबट्याही आहे. पण हा बिबट्या फोटोग्राफरशिवाय दुसऱ्या कुणालाच दिसत नाही आहे.
या हिमबिबट्याचे फोटो कितीतरी लोकांपर्यंत पोहोचले आहे. यामध्ये हिमबिबट्या शोधण्यात लोकांना मजा येत आहे, याचा आम्हाला आनंद वाटत आहे. असं म्हणत #findthesnowleopard आणि #snowleopard असं हॅशटॅगही दिलं आहे.
हे वाचा - VIDEO - आपल्या इवल्याशा तोंडात त्याचा जबडा धरला आणि...; एवढ्याशा बेडकाने श्वानाचे केले हाल
आता या पहिल्या फोटोत तुम्हाला बिबट्या दिसतो आहे का सांगा आणि तो सापडला तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. शिवाय या फोटोत बिबट्या शोधण्याचं चॅलेंज तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांनाही द्या. त्यासाठी ही बातमी नक्क शेअर करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.