मुंबई, 27 जून : अमेरिका हा आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि शक्तिशाली देश आहे. त्यांचे चलन असलेला डॉलर हा इतर चलनापेक्षा मोठा आहे. ज्यामुळे सगळे लोक आपल्या चलनाची तुलना डॉलरशी करतात. इंटरनॅशनल मार्केटमध्ये देखील डॉलरबद्दलच बोललं जातं. एवढंच काय तर जेव्हा भारताच्या जीडीपीबद्दल बोललं जातं तेव्हा देखील आपण डॉलरपेक्षा रुपया किती पडला किंवा पोहोचला याची तुलना करतो. जगभरात डॉलर सर्वात मोठं चलन आहे असा समज अनेकांचा आहे. पण तुम्हाला माहितीय का की असे चलन आहेत, ज्याच्यासमोर डॉलर काहीच नाही. खरंतर हे चलन जगभरात सर्वात जास्त किंमतीचं आहे. याचाच अर्थ असा की अमेरिकापेक्षाही फायनॅन्शली स्ट्राँग देश आहे. खरंतर सर्वात महाग चलनाच्या बाबतीत, आखाती राज्ये कोणत्याही पाश्चात्य देशापेक्षा खूप पुढे आहेत. त्यांचे चलन मजबूत होण्याचे मुख्य कारण म्हणजे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे. चला जाणून घेऊया जगातील सर्वात महागड्या चलनाबद्दल, ज्याच्या पुढे डॉलर आणि पौंड काहीच नाही. Viral Video : पुरामध्ये वाहून जात होती गाय, JCB चालकाच्या हुशारीमुळे वाचले प्राण कुवैती दिनार हे जगातील सर्वात महाग चलन आहे. त्याचे मूल्य समजून घेण्यासाठी ते रुपयाच्या दृष्टीने समजून घ्यावे लागेल. आता 1 कुवैती दिनार तुम्ही सुमारे 267 रुपयांना खरेदी करु शकता. ही किंमत सतत बदलत राहते. जर या कुवैती दिनारची डॉलरशी तुलना केली तर, 1 कुवैती दिनारसाठी तुम्हाला 3.25 डॉलर द्यावे लागतात. कुवेत हा सर्वात मोठा तेल निर्यातदार देश आहे. इथला दुसरा सर्वात मोठा उद्योग पोलाद निर्मितीचा आहे. कुवेतच्या जीडीपीपैकी जवळपास अर्धा भाग तेलावर आधारित आहे. तुम्हाला माहितीय का जगातील सर्वात गरीब देश? दारिद्र्य काय असतं यांना विचारा या यादीत बहरीनी दिनार दुसऱ्या क्रमांकावर आहे. एका बहरीनी दिनार खरेदी करण्यासाठी 217 रुपये आणि 2.65 डॉलर्स खर्च करावे लागतात. इथली अर्थव्यवस्थाही तेल आणि वायूवर अवलंबून आहे. याशिवाय हे देश येथील बँकिंग सेवेसाठीही ओळखले जाते. मात्र, सरकारचा सर्वाधिक महसूल म्हणजेच 85 टक्के महसूल केवळ तेलातून येतो. या यादीत ओमानी रियाल तिसऱ्या स्थानावर आहे. हा देश एक आखाती प्रदेश आणि पश्चिम आशियाचा भाग देखील आहे. इथली अर्थव्यवस्थाही प्रामुख्याने नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलावर आधारित आहे. सरकारचा 85 टक्के महसूल फक्त तेल आणि वायूमधून येतो. 214 रुपये आणि 2.60 डॉलर्स खर्च करुन तुम्ही1 ओमानी रियाल खरेदी करु शकता. जॉर्डन दिनार हे जगातील चौथ्या क्रमांकाचे महागडे चलन आहे. पश्चिम आशियामध्ये एक देश आहे जो जॉर्डनच्या काठावर वसलेला आहे. मात्र, हा देश आर्थिकदृष्ट्या तेवढा मजबूत नाही. याला आंतरराष्ट्रीय संस्थांकडून खूप मदत मिळते. याशिवाय जगभरात पसरलेले जॉर्डनचे लोक इथल्या परकीय चलनाच्या प्रवाहात मदत करतात. व्यापार आणि वित्त हे येथील उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहेत. 115.52 रुपयांना 1 जॉर्डनियन दिनार खरेदी करता येते. पाचव्या स्थानावर पाउंड स्टर्लिंग आहे. हे यूकेचे चलन आहे. यूके युरोपियन खंडात स्थित आहे. त्यात एकूण ४ देश आहेत. इंग्लंड, नॉर्थन आयर्लंड, वेल्स आणि स्कॉटलंड आहे. 1 UK पाउंड स्टर्लिंगमध्ये 102 रुपये खरेदी करता येतात. यूके ही 4 देशांची राजकीय संघटना म्हणून समजली जाऊ शकते ज्यावर इंग्लंडचा राजा राज्य करतो. यूकेचे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत सेवा क्षेत्र आहे, ज्यामध्ये वित्त, मनोरंजन आणि पर्यटन यांचा समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.