जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Desi Jugad : पाणी काढण्यासाठी व्यक्तीनं लावला जुगाड; Video पाहून नक्कीच कराल कौतुक

Desi Jugad : पाणी काढण्यासाठी व्यक्तीनं लावला जुगाड; Video पाहून नक्कीच कराल कौतुक

देसी जुगाडाचा व्हिडीओ

देसी जुगाडाचा व्हिडीओ

सध्या एका गावातील जुगाडाचा व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्ही नक्कीच त्याचं कौतुक कराल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 12 जुलै : जुगाड आणि भारतीय हे नातं काही औरच आहे. असे अनेक भारतीय आहेत, जे जिवनावशक गोष्टींसाठी देखील असा काही जुगाड करतात की तो फायदाचा ठरतो. असे फार कमी जुगाड असतील जे फेल होत असतील, मात्र बहुतांश लोकांचे जुगाड हे कामाचेच असतात. एखाद्या छोट्या गोष्टीसाठी माहागडी वस्तू किंवा मशिन घेण्यापेक्षा आहे त्या गोष्टींनी कामचलावू पणा करणं हाच खरा जुगाड. जुगाडासंबंधीत अनेक फोटो किंवा व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. सध्या असाच एका गावातील जुगाडाचा व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्ही नक्कीच त्याचं कौतुक कराल. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये ऑटोमॅटिक हँडपंप बनवण्याची युक्ती पाहून लोक थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून त्याला खूप पसंती दिली जात आहे. Viral Video : मस्करीची झाली कुस्करी, भुकेनं व्याकूळ मगरीसमोर मित्राला फेकलं आणि… खरंतर हँडपंप किंवा बोरिंगमधून पाणी उपसून काढणं हे मेहनतीचं काम आहे. यासाठी वेळ तर वाया जायचाच शिवाय खूप शक्ति देखील वाया जायची. त्यामुळे यावर चांगला उपाय एका व्यक्तीने शोधून काढला आहे, जो एक जुगाड आहे.

जाहिरात

जुन्या सायकलची चेन-पॅडल आणि स्विचच्या मदतीने एका व्यक्तीने अशी वस्तू कशी तयार केली आहे, ते पाहून लोक त्या व्यक्तीच्या या अप्रतिम जुगाडाचे चाहते होत आहेत, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने जुगाड तंत्राने स्वदेशी हँडपंपचे स्वयंचलित हँडपंपमध्ये रूपांतर केले आहे. शेतात रोप लावण्यासाठी शेतकऱ्याने लावला देसी जुगाड, Video पाहून नक्कीच कराल कौतुक व्हिडीओच्या सुरुवातीला दिसत आहे की, एखादी व्यक्ती इलेक्ट्रिक स्वीच चालू करताच लगेचच मोटर चालू होते, त्यामुळे पाईपला जोडलेला हातपंप आपोआप चालू लागतो. ज्यामुळे पाणी बाहेर पडू लागते. जुगाड पाहून लोक त्या व्यक्तीचे कौतुक करताना थकत नाहीत. या व्हिडीओला लाखो व्ह्यूज आले आहेत. तर अनेक लोक या व्यतीचं कौतुक करत आहेत. तर काहींचं असं देखील म्हणणं आहे की मी यापेक्षाही चांगला जुगाड करु शकलो असतो. जे पण असोत, हा जुगाड मात्र खरंच खुप फायदेशीर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात