मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पुढच्या वर्षी पृथ्वीवर येणार एलियन्स? 'टाइम ट्रॅव्हलर'चा भयावह दावा

पुढच्या वर्षी पृथ्वीवर येणार एलियन्स? 'टाइम ट्रॅव्हलर'चा भयावह दावा

2022च्या अखेरीस एलियन पृथ्वीवासीयांना भेटायला येतील. ते दिसायला माणसापेक्षा खूप मोठे आणि भयंकर असतील, असं एका टाइम ट्रॅव्हलर म्हणवणाऱ्या व्यक्तीचं म्हणणं आहे.

2022च्या अखेरीस एलियन पृथ्वीवासीयांना भेटायला येतील. ते दिसायला माणसापेक्षा खूप मोठे आणि भयंकर असतील, असं एका टाइम ट्रॅव्हलर म्हणवणाऱ्या व्यक्तीचं म्हणणं आहे.

2022च्या अखेरीस एलियन पृथ्वीवासीयांना भेटायला येतील. ते दिसायला माणसापेक्षा खूप मोठे आणि भयंकर असतील, असं एका टाइम ट्रॅव्हलर म्हणवणाऱ्या व्यक्तीचं म्हणणं आहे.

नवी दिल्ली, 28 जुलै:  पृथ्वीपासून (Earth) दूर असलेल्या काही ग्रहांवर (Planet) जीवसृष्टी असून, तिथले लोक पृथ्वीवर येतात असं मानलं जातं. अशा परग्रहवासियांना ‘एलियन’(Alien) म्हटलं जातं. एलियन्सचं रहस्य अद्याप विज्ञानालाही उलगडता आलेलं नाही;मात्र एलियन्सबद्दल अनेक सुरस कथा चर्चेचा विषय ठरतात. अधूनमधून एलियन्स दिसल्याच्या, त्यांच्या खाणाखुणा आढळल्याचे दावे-प्रतिदावे केले जातात. चित्रपटातून काल्पनिक एलियन्स आपण पाहिले आहेत; मात्र आजतागायत एलियन्स प्रत्यक्षात कसे दिसतात याचा ठोस पुरावा नाही. आता पुढच्या वर्षी एलियन्स पृथ्वीवर येणार असल्याचा ठाम दावा एका टाईम ट्रॅव्हलर (Time Traveller) म्हणवणाऱ्या व्यक्तीनं केला आहे. 2022च्या अखेरीस एलियन पृथ्वीवासीयांना भेटायला येतील. ते दिसायला माणसापेक्षा खूप मोठे आणि भयंकर असतील, असंही या व्यक्तीनं म्हटलं आहे. फ्यूचर टाइम ट्रॅव्हलर (Future time traveler) नावानं टिकटॉकवर अकाउंट असणाऱ्या एका व्यक्तीनं हा दावा केला असून, त्याच्या म्हणण्यानुसार तो स्वत: 2491 या सालात सध्या जगत असून, मानव आणि एलियन्स यांच्यात भयंकर युद्ध (War) होणार असल्याची माहिती आपल्याला असल्याचा दावाही त्यानं केला आहे. एलियन्सबद्दल अनेक प्रकारची माहिती त्यानं दिली असून, लोकांना ही माहिती अतिशय रोमांचक वाटत आहे. प्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर 24 मे 2022 रोजी दिसणार एलियन : या व्यक्तीनं एलियनची भेटीची तारीखही अगदी ठामपणे सांगितली आहे. त्याच्या मते, पुढच्या वर्षी 24 मे 2022 रोजी दुसर्‍या ग्रहावरचे लोक अर्थात एलियन्स पृथ्वीवर येतील. पहिल्यांदाच ते पृथ्वीवर दिसतील. ते येताना शांततेनं येतील मात्र नंतर माणसाविरुद्ध युद्ध पुकारतील. ते दिसायला माणसापेक्षा खूप वेगळे असतील. त्यांची उंची 7 फूट असेल आणि दिसायला अतिशय भयानक असतील. सध्या 2491 मध्ये जगत असल्याचा दावा करणाऱ्या या व्यक्तीच्या मते, आगामी काळात अनेक प्रकारचे एलियन्स पृथ्वीवर येतील आणि ते पृथ्वीवरच वास्तव्य करतील. त्यांना निरॉन्स (Nirons) म्हणून ओळखले जाईल. भयंकर! ट्रेनमध्येच महिलेचं धक्कादायक कृत्य; VIDEO पाहून चक्रावून जाल अमेरिका एलियनविरुद्ध युद्ध करेल : या एलियन्सविरुद्ध अमेरिका (USA) पहिल्यांदा युद्ध पुकारेल असा दावाही या व्यक्तीनं केला आहे. तब्बल 7 फूट 4 इंच उंच आणि मोठी कवटी असलेले हे एलियन्स गडद राखाडी रंगाचे असतील. एकदा त्यांना युद्धासाठी चिथावल्यानंतर ते अत्यंत धोकादायक ठरतील, असंही या व्यक्तीनं म्हटलं आहे. अगदी ठामपणे एलियन्सच्या अस्तित्वाबद्दल, त्यांच्या पृथ्वीवरील आगमनाबद्दल दावा करणाऱ्या या व्यक्तीकडे याबाबतचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. मात्र त्याचा व्हिडिओ टिकटॉकवर (TikTok) प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, आतापर्यंत 94 हजाराहून अधिक वेळा तो पाहिला गेला आहे. लोक अनेक प्रश्न उपस्थित करत असून, एलियन्सची चर्चा जोर धरत आहे. एका युझरनं मानव आणि एलियन्स यांची नवीन प्रजाती तयार होणार का, असा प्रश्न विचारला आहे, तर दुसऱ्या एका युझरनं आपल्याला याची भीती वाटत असल्याचं म्हटलं आहे. त्यावर एका युझरनं सरकार त्यावर आधीच काम करत असल्याचं म्हटलं आहे. या सगळ्या प्रश्नांना उत्तर देताना या टाइम ट्रॅव्हलरनं, आपल्याला जेवढी माहिती आहे ती सगळी सांगितली असून, त्याला आपलं आयुष्यही धोक्यात आल्याचं स्पष्ट दिसत आहे, असं म्हटलं आहे.
First published:

Tags: Aliens, Tik tok, Viral

पुढील बातम्या