मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO: अभिनेत्रींनाही मागे टाकणारं सौंदर्य, चुलीवर स्वयंपाक बनवणाऱ्या Viral तरुणीच्या निरागसतेवर नेटकरी फिदा

VIDEO: अभिनेत्रींनाही मागे टाकणारं सौंदर्य, चुलीवर स्वयंपाक बनवणाऱ्या Viral तरुणीच्या निरागसतेवर नेटकरी फिदा

या तरुणीचे रिल सध्या इन्स्टाग्रामवर (Instagram) व्हायरल (Viral) होत आहेत. यात तिच्या निरासगतेनं नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

या तरुणीचे रिल सध्या इन्स्टाग्रामवर (Instagram) व्हायरल (Viral) होत आहेत. यात तिच्या निरासगतेनं नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

या तरुणीचे रिल सध्या इन्स्टाग्रामवर (Instagram) व्हायरल (Viral) होत आहेत. यात तिच्या निरासगतेनं नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

मुंबई 07 जून: आजकाल सोशल मीडिया अगदी सामान्य लोकांनाही रातोरात स्टार बनवतो. सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल (Viral on Social Media) होताच अनेकांना भलतीच प्रसिद्धी मिळाली आहे. याचाच प्रत्यय आता पुन्हा एकदा आला आहे. असं म्हणातात की, फोटो चांगला येण्यासाठी चांगले कपडे नाही तर चांगलं हास्य महत्त्वाचं असतं. हे अगदी खरं आहे, हे दाखवून दिलं आहे चुलीवर भाकरी बनवणाऱ्या एका तरुणीनं. मागील काही दिवसांपासून तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. जर तुम्ही हे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पाहा, कारण यातील या तरुणीचं हास्य मोठमोठ्या मॉडेल्सलाही मागं टाकणारं आहे. @ekiya5 या इन्स्टा अकाऊंटवरुन हे व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.

View this post on Instagram

A post shared by @ekiya5

या तरुणीचे रिल सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहेत. यात तिच्या निरासगतेनं नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. एका रिलमध्ये ती चुलीवर भाकरी बनवत आहे. या व्हिडिओमधील तिचा देशी अंदाज लोकांच्या भलताच पसंतीस उतरत आहे. तिचे हे व्हिडिओ या गोष्टींना खोटं ठरवणारे आहेत, की केवळ मेकअप आणि चांगली कपडेच चांगलं दिसण्यासाठी गरजेची आहेत. तिच्या व्हिडिओतून हे समजतं की सौंदर्यासाठी केवळ हास्यच पुरेसं आहे.

View this post on Instagram

A post shared by @ekiya5

बहुतेक व्हिडिओमध्ये ती घरातील काम करताना दिसत आहे. मोकळ्या अंगणात ती स्वयंपाक करताना दिसते. तर, आजूबाजूला इतरही लोक बसलेले दिसतात. तिचं पूर्ण नाव अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, तिच्या व्हिडिओला नेटकऱ्यांची भलतीच पसंती मिळत आहे. नेटकरी तिचं सौंदर्य, निरागसता आणि साधेपणाचं कौतुक करत आहेत.

First published:

Tags: Beauty queen, Social media viral, Videos viral