नवी दिल्ली, 04 मार्च : टिकटॉवर (TikTok) नेहमीच नवनवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्याचबरोबर विविध चॅलेंजही टिकटॉवर येत असतात. मात्र यावेळी एक भयंकर ट्रेंड आला आहे, हे चॅलेंज दिसायला मजेशीर असले तरी ते जीवघेणे ठरू शकते. सध्या व्हायरल होत असलेले हे चॅलेंज आहे सॉल्ट चॅलेंज (Salt Challenge). मात्र हे चॅलेंज अनेकांच्या जीवावर बेतले आहे. याआधी टिकटॉकवर स्कलब्रेक चॅलेंज आले होते. त्यानंतर आलेल्या या सॉल्ट चॅलेंजने सगळ्यांची झोप उडवली आहे. या चॅलेंजमध्ये युझर तोंड भरून मीठ खाताना दिसत आहेत. या चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी युझरना खुप सारे मीठ खावे लागते. तोंडात जास्तीत जास्त मीठ भरल्यानंतर, शेवटी ते बाहेरही काढावे लागते. मात्र काही वेळा हे मीठ गिळल्यामुळे तुमच्या जीवालाही धोका पोहचू शकतो. वाचा- VIDEO : ‘सकाळीच चीनहून आलोय’, मेट्रोमध्ये मुलाचं बोलणं ऐकून रिकामी झाली मेट्रो
@okayimjonathan salt challenge!! this was disgusting ##foryoupage ##foryou ##featurethis ##viral ♬ original sound - okayimjonathan
@karthikakaav Arkenglum kazhiyumengl duetadiku othiri kashtapetatha namuda effortnonuarum lyk tarila ##saltchallenge ♬ original sound - Kathu
@dollypatil46 ye karke dikaho ♀️ #s #altchallenge ♬ original sound - befikrasameed
वाचा- कोरोना सोडा हे त्याहूनही जास्त भयंकर! आरोग्याशी कसा होतोय खेळ, पाहा VIDEO या चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी खुप मीठ खाणे ही एकमेक अट आहे. मात्र खुप सारे मीठ खाल्यामुळे ते हानीकारक ठरू शकते. आतड्यांमध्ये हे मीठ गेल्यास तुमच्या जीवावरही बेतू शकते. वाचा- VIDEO : असा शॉट विराट-धोनीलाही जमणार नाही, क्रिकेटपटूचा नवा शॉट VIRAL का आहे हे चॅलेंज जीवघेणे हे चॅलेंज अतिशय धोकादायक आहे. त्याचे दुष्परिणाम वाईट आहेत. जरी लोक मीठ बाहेर काढत असले तरी, पुरेशाप्रमाणात मीठ तोंडात असते. यामुळे मेंदूला सूज येऊ शकते. तसेच, या आजारपणामुळे तहान, चक्कर येणे किंवा उलट्या होऊ शकतात फक्त एवढेच नव्हे तर हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब, डोकेदुखी आणि मूत्रपिंडाच्या आजाराची लक्षणे देखील दिसू शकतात.

)







