मुंबई, 20 ऑगस्ट : वाघ (Tiger) अगदी हुशारीने आपली शिकार पकडतो. जो वाघाची (Tiger attack) शिकार होणार त्याला समजण्याच्या आताच तो त्याच्यावर हल्ला करतो. एकदा का वाघाच्या (Tiger video) तावडीत सापडलं की मग मात्र त्या प्राण्याची (Animal video) सुटका होणं अशक्यच. पण शिकारीत प्रत्येक वेळी वाघाला यश मिळेलच असं नाही. सध्या अशी शिकार करायला गेलेल्या वाघाची कशी फजिती झाली (Tiger attack on bear), याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अस्वलाची (Bear video) शिकार करायला गेलेल्या वाघाला (Tiger bear video) स्वतःचाच जीव वाचवण्यासाठी पळावं लागलं. अस्वलावर (Bear tiger video) हल्ला करणं त्याला चांगलंच महागात पडलं. आपला जीव मुठीत धरून वाघ वाऱ्याच्या वेगाने पळत सुटला.
Bear takes the prank seriously.
— Susanta Nanda (@susantananda3) August 19, 2021
Via Channa Prakash pic.twitter.com/oA4U0a7RGk
व्हिडीओत पाहू शकतो अस्वल स्वतःसाठी काहीतरी खायला शोधतो आहे. तितक्यात मागून एक वाघ येतो. हे वाचा - असं कसं शक्य आहे! ओव्हनमध्येच फडफडू लागला मासा, Viral Video पाहून व्हाल हैराण वाघ हलक्या पावलांनी येतो. जेणेकरून अस्वल सावध होणार नाही. अस्वलावर हल्ला कऱण्याच्या उद्देशाने वाघ त्याच्या दिशेने जातो. अस्वलला तो आपल्या दोन्ही हातात धरण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचा पंजा लागतात अस्वल पटकन मागे वळतं. तोसुद्धा वाघावर हल्ला करण्यासाठी तयार होतो. अस्वलाचं रूप पाहून वाघही बिथरतो. अस्वलापासून तो लगेच मागे होतो. आपली शिकार करायला आलेल्या वाघाच्याच मागे अस्वल लागतं आणि मग काय वाघ भीतीने तिथून धूम ठोकतो. तो आपला जीव वाचवण्यासाठी पळत सुटतो. अस्वलाची शिकार करायला आला पण त्याच्यावर स्वतःचाच जीव वाचवण्याची वेळ आली. कसाबसा करून तो अस्वलाच्या तावडीतून सुटला. हे वाचा - VIDEO - सुपरमार्केटमध्ये दबा धरून बसला होता भलामोठा अजगर; महिलेने डबा हटवताच… आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहे. अस्वलाने वाघाला चांगलीच अद्दल घडवली, असं दृश्यं पाहायला मिळणं म्हणजे दुर्मिळच, अस्वलाने वाघाला चांगलंच ठिकाणावर आलणं अशा प्रतिक्रिया नेटिझन्स देत आहेत.