मुंबई, 09 मे : वाघाशी (Tiger) पंगा नको रे बाबा! माणूसच नव्हे तर कित्येक प्राण्यांनाही (Animal video) वाघाची (Tiger video) भीती वाटते. वाघाला पाहताच तेसुद्धा धूम ठोकतात आणि आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात. पण एका छोट्याशा बदकाने (Duck) मात्र वाघासोबत असं काही केलं आहे, जे मोठ्या प्राण्यांनाही जमणं शक्य नाही. वाघ आणि बदकाचा (Duck and Tiger video) हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral video) होतो आहे.
छोट्याशा बदकाने वाघाची चांगलीच दमछाक केली आहे. समोर असूनही वाघाला बदकाला पकडणं काही शक्य झालं नाही. यावेळी वाघाची अवस्थाही पाहण्यासारखी होती.
A dangerous game The duck is doing what it is supposed to do... Ducking pic.twitter.com/AitpojmSwp
— Rahul Jadhav IFS (@rah_jad) May 6, 2021
व्हिडीओत पाहू शकता पाण्यात बदक आणि वाघ आहे. वाघ बदकाची शिकार करण्यासाठी म्हणून पाण्यात उतरला. पण बदक त्याच्या समोर असूनही त्याला पकडता येत नव्हतं आणि याचं कारण म्हणजे जे कौशल्य बदकाकडे होते ते या वाघाकडे नव्हतं आणि ते म्हणजे पाण्यात सहज लपून चकवणं.
हे वाचा - अरे बापरे! शार्कने बोटच जबड्यात धरली आणि...; पुढे काय झालं पाहा VIDEO
बदक पाण्यातून बाहेर येत, वाघाच्या नजरेत पडतं, वाघ संधी साधत त्याच्यावर हल्ला करायला जातं. पण शेवटी वाघाचा हात रिकामाच राहतो आणि बदक पाण्यात दुसऱ्याच ठिकाणी दिसतं. असं किती तरी वेळा होतं. तरी वाघ बदकाला पकडण्याचा प्रयत्न करतं आणि तितक्याच वेळा बदकही वाचतं. जणू काही ते वाघासोबत लपाछपीच खेळतं आहे.
आयएफएस अधिकारी राहुल जाधव यांनी आपल्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याला त्यांनी डेंजरस गेम असं कॅप्शनही दिलं आहे. या व्हिडीओवर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. बदकाच्या हुशारीला अनेकांनी दाद दिली आहे.
हे वाचा - VIDEO : मला लग्न करायचं आहे! भलताच हट्ट करत बाबासमोर ढसाढसा रडली चिमुकली लेक
म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ त्याचाच प्रत्यय या व्हिडीओतून येतो. बदकाकडे वाघासारखी शक्ती नाही पण त्याच्याकडे वाघापासून वाचण्याची युक्ती मात्र आहे आणि तीच त्याच्या कामी येताना दिसते आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tiger, Tiger hunting video, Viral, Viral videos