मराठी बातम्या /बातम्या /Viral /

रस्त्यावरील फक्त एका दगडाला पाहून हरणानं ठोकली धूम; नेमकं काय घडलं पाहा VIDEO

रस्त्यावरील फक्त एका दगडाला पाहून हरणानं ठोकली धूम; नेमकं काय घडलं पाहा VIDEO

तसं जंगलात बरेच दगड असतात. पण मग या दगडात असं काय होतं, जे पाहून हरण घाबरलं?

तसं जंगलात बरेच दगड असतात. पण मग या दगडात असं काय होतं, जे पाहून हरण घाबरलं?

तसं जंगलात बरेच दगड असतात. पण मग या दगडात असं काय होतं, जे पाहून हरण घाबरलं?

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 16 फेब्रुवारी : आतापर्यंत शिकारीचे बरेच व्हिडीओ (video) आम्ही तुम्हाला दाखवले. एखाद्या प्राण्यापासून दुसऱ्या प्राण्यानं आपला जीव कसा हुशारीनं वाचवला हेदेखील आपण पाहिलं आहे. सध्या सोशल मीडियावर (social media) असा व्हिडीओ व्हायरल (viral video) होतो आहे, ज्यामध्ये एक हरण (deer) चक्क एका दगडाला (rock) घाबरलं आहे. रस्त्याच्या मधोमध असलेल्या दगडाला पाहताच त्याने धूम ठोकली. नेमकं असं घडलं तरी काय? एका ट्विटवर युझरनं हरणाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये एक हरण छोट्याशा रस्त्याजवळ येतं. इथं तिथं पाहतं. तसं त्याच्या आजूबाजूला कुणीच नसतं. इतक्यात त्याची नजर एका दगडावर पडते. हा दगड अगदी रस्त्याच्या मधोमध आहे. त्याला त्या दगडात असं काही दिसतं की तो सावध होतो आणि तिथून तात्काळ पळ काढतो. तुम्ही व्हिडीओ पूर्ण पाहाल तर तुम्हाला याचं कारण समजेल. या हरणाला तिथं काहीतरी विचित्र असल्याचं समजतंच. आपल्या आजूबाजूला धोका आहे, याची जाणीव त्याला होते. त्यामुळे ते अरदी सावधपूर्वक सगळीकडे नजर फिरवत असतं. जेव्हा त्याची नजर त्या दगडावर पडते, तेव्हा त्या दगडात त्याला काहीतरी विचित्र दिसतं. तो दगड हलताना दिसतं. हे वाचा - चांगल्याची दुनियाचं राहिली नाही; गायीला वाचवण्यासाठी गेले दोन तरुण आणि... पुढे जे काही दिसलं ते पाहून फक्त हरणाप्रमाणेच तुम्हालाही धक्का बसेल. कारण त्या दगडाची हालचाल होते. कारण रस्त्याच्या मधोमध असलेला तो दगड म्हणजे दगड नाही तर चक्क वाघ होता. दगडाचा आकार घेऊन हा वाघ रस्त्यावर मध्येच शिकारीसाठी दबा देऊन बसला होता. जेणेकरून त्याला शिकार करणंही सोपं होईल. हरणाची नजर जेव्हा दगड बनून बसलेल्या त्या वाघावर पडते तेव्हा त्याची शेपटी थोडी हलते. मग हरणाला समजतं, हा फक्त दगड नाही तर आपल्यावरील मोठं संकट आहे. त्यामुळे ते तिथून वेळेत पळ काढतं. हरण तिथून गेल्यानंतर दगड बनलेला वाघ हलतो. आधी आपलं डोकं वर करतो. त्यानंतर आजूबाजूला पाहतो आणि उभा राहून मग चालायला लागतो. हे वाचा - आधी धुर सोडला नंतर अख्खा गिळला, माशाच्या शिकारीचा आतापर्यंत न पाहिलेला VIDEO @Saket_Badola ट्विटवर अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जंगलात दगडसुद्धा हलू शकतो, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर बऱ्याच प्रतिक्रिया उमटत आहेत. एका युझरनं तर नजर हटी दुर्घटना घटी अशीच प्रतिक्रिया दिली आहे.
First published:

Tags: Deer, Deer frightened, Rock on road, Tiger, Viral, Viral videos, Wild animal

पुढील बातम्या