मुंबई 27 मे : जीवशास्त्राशी निगडित संशोधक किंवा प्राणीसंग्रहालयातील काळजी घेणारे कर्मचारी अनेकदा भयानक प्राण्यांच्या अगदी जवळ जातात, पण त्यांना काहीही होत नाही. सिंह आणि वाघ त्यांचे मित्र बनतात आणि बहुतेक वेळा त्यांच्या अगदी जवळ जाऊनही सिंह आणि वाघ त्यांना इजा करत नाहीत. पण वन्य प्राणी हे जंगलीच असतात. ते कधी हल्ला करतील हे कोणीच सांगू शकत नाही. याचाच प्रत्यय सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
VIDEO - जंगलाच्या राजाचा बर्थडे! थेट सिंहाजवळ केक घेऊन गेले तरुण; पुढे जे घडलं ते थरकाप उडवणारं
या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सिंह आणि वाघांसोबत मस्ती करताना दिसत आहे, इतक्यात अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. नुकतंच @_B___S नावाच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो जुना आहे पण तो पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सिंह आणि वाघ यांच्यासोबत मस्ती करताना दिसत आहे. जंगली प्राणी किती धोकादायक असू शकतात हे प्रत्येकालाच माहिती आहे. त्यांच्याकडे जाण्याचा विचार स्वप्नातही कोणी करू शकत नाही. पण या व्हिडिओमध्ये ती व्यक्ती फक्त त्यांच्या जवळच बसलेली नाही तर त्यांच्यासोबत खेळतानाही दिसत आहे.
Tiger saves man from a leopard attack pic.twitter.com/bI6o8IMmeL
— B&S (@_B___S) May 24, 2023
व्हिडिओमध्ये अनेक पांढरे सिंह आणि सामान्य सिंह देखील व्यक्तीच्या जवळ बसलेले आहेत. याशिवाय अनेक वाघ मागे फिरतानाही दिसतात. असं जाणवतं की हे प्राणीसंग्रहालय किंवा अभयारण्य आहे जिथे प्राणी पाळले जातात आणि त्यांची काळजी घेतली जाते. ती व्यक्ती त्या प्राण्यांशी मस्ती करत आहे, त्यांच्या पोटाला हात लावत आहे आणि ते त्याला पाळीव प्राण्यासारखं चिकटून बसले आहेत. त्याला अजिबात इजा पोहोचवत नाहीत. इतक्यात अचानक काही अंतरावर असलेला वाघ सावध होऊन शिकारीच्या मुद्रेत येतो. तेव्हाच दिसतं की एक बिबट्या धावत या व्यक्तीच्या दिशेने येत आहे. जणू तो शिकारीच्या किंवा हल्ला करण्याच्या बेतात आहे.
इतक्यात अचानक वाघ बिबट्या आणि माणसाच्या मध्ये येतो आणि बिबट्याला माणसावर झेप घेण्यापासून थांबवतो. प्रथमदर्शनी बिबट्या व्यक्तीवर हल्ला करण्यासाठी धावत असल्याचं दिसतं, मात्र त्यानंतर हल्ला करण्याऐवजी तो तिथेच खेळू लागतो. या व्हिडिओला 1 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटलं की, वाघाने दुरून पाहिलं की बिबट्या हल्ला करणार आहे. एकाने म्हटलं की, बिबट्या फक्त मजा करत होता, त्याला हल्ला करायचा नव्हता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Leopard, Tiger attack