जाहिरात
मराठी बातम्या / Viral / चिमुकल्यावर हल्ला करण्यासाठी भुकेलेल्या वाघाची मोठी उडी अन्..., काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

चिमुकल्यावर हल्ला करण्यासाठी भुकेलेल्या वाघाची मोठी उडी अन्..., काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

चिमुकल्यावर हल्ला करण्यासाठी भुकेलेल्या वाघाची मोठी उडी अन्..., काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

अचानक वाघाला त्या मुलाचा राग आला. यानंतर वाघाने मुलावर हल्ला केला. सुदैवाने या घटनेत मूल वाचलं

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 30 मार्च : प्राणीसंग्रहालयात जाण्यासाठी लहान मुलं खूप उत्सुक असतात. प्रत्येकाला प्राणी पाहणं आणि त्यांच्याबद्दल जाणून घेणं आवडतं, परंतु जेव्हा प्राणी हल्ला करतात तेव्हा ही परिस्थिती खूप धोकादायक असू शकते. असाच काहीसा प्रकार प्राणीसंग्रहालयात वाघ पाहणाऱ्या मुलासोबत घडला. अचानक वाघाला त्या मुलाचा राग आला. यानंतर वाघाने मुलावर हल्ला केला. सुदैवाने या घटनेत मूल वाचलं असलं तरी ही घटना पाहून काही क्षण लोकांचा श्वास रोखला गेला. VIDEO - मगरीच्या पाठीवर बसून हिसकावला तिच्या तोंडचा घास; भुकेल्या मगरीने व्यक्तीला… इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये वाघ एका लहान मुलावर हल्ला करताना दिसत आहे. हा 8 ते 10 वर्षांचा मुलगा वाघापासून वाचला असला तरी ही घटना भयानक होती. विशेष म्हणजे वाघाला पाहून घाबरण्याऐवजी मुलाला आनंद वाटू लागला आणि त्याला हसताना पाहून तिथे उपस्थित असलेले लोक घाबरले.

जाहिरात

इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये वाघ समोर उभा असल्याचे दिसत आहे. वाघ हळू हळू मुलाच्या दिशेने येऊ लागतो. दुसरीकडे, वाघाला पाहून घाबरण्याऐवजी मूल हसायला लागतं. अशा स्थितीत लहान मुलाने वाघावर नजर टाकताच वाघ पूर्ण वेगाने त्या मुलावर झेपावतो, मात्र मध्ये असलेल्यामुळे या मुलाचा जीव वाचतो.

News18लोकमत
News18लोकमत

हा मुलगा वाघापासून सहज वाचतो. याचं कारण वाघ आणि मुलगा यांच्यामध्ये प्राणीसंग्रहालयात काच आहे. वेग जास्त असूनही, काचेवर आदळल्यानंतर वाघ थांबतो आणि मुलगा जोरात हसायला लागतो. मात्र ही घटना पाहून आसपासचे लोक खूप घाबरले. हा व्हिडिओ आतापर्यंत 20 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि लोक व्हिडिओवर मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात