मुंबई, 29 मार्च : सिंह जंगलाचा राजा असेल तर मगरी चं पाण्यात राज्य असतं. तिच्यासमोर जंगलाच्या राजाचंही काहीच चालत नाही. सिंह, वाघ, बिबट्या असे शक्तिशाली प्राणीही मगरीला घाबरतात. काही क्षणात मगरी या प्राण्यांचाही खात्मा करते. पण अशा मगरीसमोर माणसांचा टीकाव लागणं शक्यच नाही. पण तरी काही असे लोक जे अशा खतरनाक मगरीशी पंगा घेतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. मगरीचे तसे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यात मगर प्राण्यांची शिकार करताना दिसते. अशा मगरीसमोर एखादा माणूस गेला आणि त्याने या मगरीशी पंगा घेतला तर काय होईल? फक्त विचार करूनच तुम्हाला घाम फुटला ना? एका व्यक्तीने तशी डेअरिंग केली. ती फक्त मगरीच्या जवळच गेली नाही. तर हातात मांस घेऊन तिच्या पाठीवर बसली. त्यानंतर तिने मगरीसोबत नको तोच खेळ केला. VIDEO - श्वानांनी खतरनाक मगरीची धरली पाठ; तुम्ही विचारही केला नसाल असा शॉकिंग शेवट व्हिडीओत तुम्ही पाहू शकता भलीमोठी मगर जमिनीवर दिसते आहेत. तिच्या पाठीवर ही व्यक्ती बसली आहे, जिच्या हातात मांस आहे. सुरुवातीला ती मगरीच्या तोंडाजवळ त्या मांसाने मारते, तशी ती मगर मागे वळते. ती व्यक्ती मांस मगरीच्या तोंडाजवळ नेते आणि पुन्हा मागे खेचते. असंच बऱ्याच वेळा ती करते. मगर भुकेली आहे, त्यामुळे ती व्यक्तीच्या हातातील मांस खाण्यासाठी धडपड करते. काही क्षण असं वाटतं की आता मांसाऐवजी ही व्यक्तीच मगरीच्या पोटात जाते की काय?
व्हिडीओच्या शेवटी ती मगर व्यक्तीच्या हातातील मांस खेचून घेते आणि ते मांस मगरीच्या जबड्यात असते. ती मांस खाते आणि पाठीवरील व्यक्ती तशीच बसून राहते. या व्यक्तीचं नशीब चांगलं म्हणून ती मगरीपासून वाचली आहे, असंच म्हणावं लागेल. VIDEO - पिकनिक स्पॉटवर आली मगर; शिकार सोडून जे पळवलं ते पाहून व्हाल थक्क bilal.ahm4d इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने या मगरीने जसं मांस खाल्लं तसं या माणसाला खायला वेळ लागणार नाही. ही मगर तशी संधी सोडणार नाही, अशा प्रतिक्रिया येत आहेत.
तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.