नवी दिल्ली 13 जुलै : भारतातील बहुतेक लोक सहसा घराबाहेरच शूज आणि चप्पल काढतात. कारण बाहेर घातलेल्या चप्पल घरात आणू दिल्या जात नाहीत. अशा परिस्थितीत लोक घराबाहेरच आपली चप्पल काढतात. काही घरांमध्ये त्या शू रॅकवर ठेवलेल्या असतात. परंतु बहुतेक लोक त्या खालीच बाजूला करून ठेवतात. यानंतर, दुसऱ्या दिवशी घराबाहेर पडताच हेच पायाच घालतात आणि तसेच पुढे निघतात. आपल्यापैकी बरेच जण हे सगळं असंच करतात. दुसऱ्या दिवशी रात्रीच बाहेर ठेवलेल्या शूज आणि चप्पलमध्ये ते आरामात आपला पाय ठेवतात. जर शूज घाण असतील तर फक्त साफसफाईचं किंवा धूळ काढण्याचं काम केलं जातं. अन्यथा काहीही न बघता ते पायात घातले जातात. पण तसं करणं कधीकधी भलतंच महागात पडू शकतं. विशेषतः पावसाळ्यात. कारण शूज आपल्या पायाचा ओलावा शोषून घेतात. याचा परिणाम असा होतो, की अनेक प्रकारचे कीटक त्याच्या सुगंधाने आकर्षित होतात आणि त्याच्याकडे खेचले जातात. तुम्हाला जर शूज घालण्यापूर्वी तपासायची सवय नसेल तर हे तुम्हाला महागात पडू शकतं.
एका व्यक्तीने आपल्या चपलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात बुटाच्या आतून एक साप डोकावताना दिसतो. हा साप खूप मोठा होता आणि तो बूटात जाऊन बसला होता. तो आकाराने मोठा असल्याने त्याचं अर्ध शरीर बुटाच्या बाहेर होतं. पण जर तो नीट गुंडाळी करून आत बसला असता, तर तो दिसलाही नसता. अशा स्थितीत पाऊल आत ठेवताच सापाने या व्यक्तीला चावा घेतला असता आणि यानंतर मोठी दुर्घटना घडण्यापासून कोणीही रोखू शकलं नसतं. सिंहिणींची शिकार चोरण्यासाठी पोहोचली मगर; इतक्यात शिकारी तिथे पोहोचले अन्.., अवाक करणारा शेवट, VIDEO पावसाळ्यात अनेक प्रकारचे कीटक, साप, विंचू बाहेर पडतात. त्यांना राहण्यासाठी शूजपेक्षा योग्य जागा मिळत नाही. पायांच्या ओलाव्यामुळे त्यांना तिथे उबदारपणा जाणवतो आणि ओलावाही मिळतो. यामुळे ते पावसाळ्यात शूजमध्ये लपणं पसंत करतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर लाखो वेळा पाहिला गेला आहे. अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत. लोकांनी म्हटलं, की या व्हिडिओनं भीतीची नवी लेवल अनलॉक केली आहे. तर अनेकांनी म्हटलं, की यापुढे नीट तपासल्याशिवाय शूज घालणार नाही.

)







