Home /News /viral /

दोन बायकांच्या भांडणात बिचाऱ्या तिसऱ्यालाच खावा लागला मार; VIDEO पाहून पोट धरून हसाल

दोन बायकांच्या भांडणात बिचाऱ्या तिसऱ्यालाच खावा लागला मार; VIDEO पाहून पोट धरून हसाल

महिलांच्या कचरा, चिखलाचा मार तिसऱ्यालाच.

  मुंबई, 11 ऑक्टोबर : महिलांची भांडणं (Woman fighting video) काही नवीन नाहीत. पण महिला भांडू लागल्या आणि त्यांची ही भांडणं हामाणारीपर्यंत पोहोचली तर शक्यतो त्या एकमेकींच्या झिंझ्या उपटताना दिसतात. पण सध्या सोशल मीडियावर असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात महिला एकमेकींच्या झिंझ्या उपटताना दिसत नाहीत. तर चक्क एकमेकींवर कचरा आणि चिखल उडवत आहेत (Woman throwing garbage mud at each other). महत्त्वाचं म्हणजे या दोघींच्या भांडणाचा मार बिचाऱ्या तिसऱ्यालाच खावा लागतो आहे. गल्लोगल्लीत जेव्हा महिलांची भांडणं होतात, तेव्हा शक्यतो ती पाण्यावरून, कचऱ्यावरून इत्यादी छोट्या छोट्या कारणांवरून होतात. अशाच साफसफाईवरून झालेल्या भांडणाचा हा व्हिडीओ आहे. ज्यात महिलांची तुफान फायटिंग झाली आहे. महिलांनी अक्षरशः कचरा आणि चिखल फेकला आहे. पण याचा मार खावा लागला तो तिसऱ्यालाच. दोन बायकांच्या भांडणात त्या तिसऱ्या बिचाऱ्या तरुणाची अवस्था भयंकर झाली आहे. हे वाचा - नवरा-नवरीचा सुरू होता रोमान्स; मध्येच वहिनीने मारली एंट्री आणि... व्हिडीओत पाहू शकता शेजारी शेजारी राहणाऱ्या या महिला एकमेकींसोबत भांडत आहेत. दोघींनीही हातात झाडू घेतला आहे आणि कचरा एकमेकींच्या दारात फेकत आहेत. भिंतीला लावलेल्या गोवऱ्या काढून त्या एकमेकींच्या दाराकडे सरकवत आहेत. या महिला फक्त कचरा लढाईवरच थांबत नाहीत तर चक्क चिखलही हातात घेतात. दोघीही घरासमोरील गटारातील चिखल हातात घेऊन एकमेकींच्या घरात फेकतात.
  याचवेळी एक तरुण दोन्ही घरांच्या मध्ये उभा राहिला आहे. त्यांच्या या चिखलफेकीच्या लढाईत बहुतेक चिखल तर या तरुणावरच उडतो. पण तो बिलकुल हलत नाही. जणू काही पुतळाच आहे, तसाच तो उभा राहतो. हे वाचा - हिला लग्नातही थोडीशी हवीच! दारूड्या नवरीबाईने कशी सेटिंग लावली पाहा VIDEO घंटा नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या महिलांच्या भांडणापेक्षा सोशल मीडियावर या तरुणाचीच चर्चा होते आहेत. त्या तरुणावरच बऱ्याच कमेंट येत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Funny video, Viral, Viral videos

  पुढील बातम्या