Home /News /viral /

नवरा-नवरीचा सुरू होता रोमान्स; मध्येच वहिनीने मारली एंट्री आणि...

नवरा-नवरीचा सुरू होता रोमान्स; मध्येच वहिनीने मारली एंट्री आणि...

नवरा-नवरीच्या मध्येच आली वहिनी आणि...

  मुंबई, 11 ऑक्टोबर : एखाद्या तरुणाचं लग्न (Wedding video) ठरल्यानंतर त्याचा आनंद जितका त्याच्या आईला होता. तितका आनंद दुसऱ्या कुणाला होत असेल तर ती म्हणजे त्याची वहिनी (Devar bhabhi video). वहिनी म्हणजे दिरासाठी एक मैत्रीण, बहीण आणि आईसुद्धा असते. त्यामुळे आपल्या दिराच्या लग्नात काहीच कमी पडू नये, याची ती पुरेपूर काळजी घेते. लग्नातील प्रत्येक विधी, कार्यक्रमात ती पुढाकार घेते. अगदी मजामस्ती आणि डान्समध्येही ती मागे पडत नाही. अशाच एका वहिनीचा व्हि़डीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात वहिनीने आपल्या दिराच्या लग्नात नवरा-नवरीचा रोमान्स सुरू असताना मध्येच एंट्री मारली आणि त्या दोघांच्या मध्ये तिने डान्स केला आहे. व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी दोघं एकमेकांसमोर उभे आहेत. दोघांनी एकमेकांचा हात धरला आहे. दोघंही एकमेकांना नजरेत भरून घेत आहेत. त्यांचा रोमान्स सुरू होता. त्यांच्या या रोमँटिक क्षण सताना मध्येच नवरदेवाची वहिनी एंट्री मारते. नवरा-नवरी दोघांच्याही मध्ये नवरदेवाची वहिनी अचानक येते आणि त्या दोघांना बाजूला करते.
  नवरा आणि नवरी दोघांनाही वहिनी ढकलते आणि ती दोघांच्या मध्येच डान्स करताना दिसते. हम आपके है कौन फिल्ममधील गाणं लो चली मैं अपनी देवर की बारात लेके...' या गाण्यावर ती थिरकताना दिसते. गाण्यावर जबरदस्त ठुमके लगावते. नवरी आणि नवरा आपल्या वहिनीचं हे रूप पाहून आश्चर्यचकीत होतात. त्यांनाही हसू येतं. हे वाचा - लग्नातच घडलं असं काही की नवरीचा हातच मोडला; दाखल केला दीड कोटीचा खटला गौरव नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Viral, Viral videos, Wedding video

  पुढील बातम्या