मुंबई, 27 जुलै : सोशल मीडियावर अनेक डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच तीन तरुणांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हे तरूण फुटबॉल घेऊन डान्स करताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे यातल्या एकाने तर चक्क लुंगी घातली आहे. हा व्हिडीओ बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने शेअर केला आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना रवीनाने आपल्या कॅप्शनमध्ये, शाब्बास मुलांनो. मी याआधी कधीच असं टॅलंट पाहिलं नाही. हे खूप अद्भुत आहे. या व्हिडीओमध्ये ही मुलं फुटबॉलसोबत जबरदस्त डान्स करत आहेत. या व्हिडीओच्या मागे गुलेबागावली या सिनेमाचे गुलेबा हे गाणं वाजवण्यात आलं आहे. मात्र तुम्ही हा व्हिडीओ नीट पाहिल्यास ही मुलं डान्स नाहीतर तर फुटबॉलसोबत सराव करताना दिसत आहे.
वाचा-PPE सूट घालून पाहुण्यांना वाढलं जेवण, अनोख्या लग्न सोहळ्याचा VIDEO VIRAL
And yes we have talent! This is so amazing! Well done boys! Hope this reaches you all wherever you guys are!♥️😍😘 pic.twitter.com/aOnkHGWQA7
— Raveena Tandon (@TandonRaveena) July 25, 2020
वाचा-कमी समजायचं नाय, साधूने 3 पेहलवानांना 5 सेकंदात दाखवले आस्मान, VIDEO VIRAL
व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या या तीन मुलांपैकी एकाचे नाव प्रदीप रमेश आहे. प्रदीप हा फ्रीस्टाइल फुटबॉलपटू आहे. फ्रीस्टाइल फुटबॉलमध्ये त्याच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही आहे. त्यामुळे हा व्हिडीओ नीट पाहिल्यानंतर ही मुलं डान्स नाही तर फुटबॉल खेळत आहे, हे समजते.
वाचा-'गँग ऑफ वासेपूर' स्टाइल कैद्यांनी ठोकली धूम, जळगाव कारागृहातील घटनेचा VIDEO
हा व्हिडीओ रवीन टंडनने 25 जुलैला शेअर केला होता. त्यानंतर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ 50 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर, 41 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पसंत केला आहे. यात सगळ्यांचे लक्ष लुंगी घालून फुटबॉल खेळणाऱ्या तरुणांने वेधले आहे.