जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 'गँग ऑफ वासेपूर' स्टाइल कैद्यांनी ठोकली धूम, जळगाव कारागृहातील घटनेचा VIDEO

'गँग ऑफ वासेपूर' स्टाइल कैद्यांनी ठोकली धूम, जळगाव कारागृहातील घटनेचा VIDEO

'गँग ऑफ वासेपूर' स्टाइल कैद्यांनी ठोकली धूम, जळगाव कारागृहातील घटनेचा VIDEO

एवढा कडेकोट बंदोबस्त असताना अशा प्रकारची घटना कशी घडू शकते. तिघे कैदी मुख्य प्रवेशद्वारच्या तुरूगरंक्षकाच्या कार्यालयात गेलेच कसे?

  • -MIN READ
  • Last Updated :

जळगाव, 26 जुलै :  जळगाव जिल्हा सबजेलमध्ये शनिवारी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास कारागृहात असलेल्या तीन कैद्यांनी पिस्तूलचा धाक दाखवून सिने स्टाईल पळ काढला. या भयानक घटनेने कारागृहाच्या सुरक्षा यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला आहे. जळगाव कारागृहाच्या सुरक्षा यंत्रणेबाबत कायम प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असताना कैदी पळाल्यामुळे जळगाव  कारागृहातील गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. प्रवेश द्वारावर असलेल्या सुरक्षा रक्षकांना शस्त्राचा धाक दाखवत आणि त्यांच्याशी झटापटकरून तीन आरोपींची चक्क मुख्य प्रवेश द्वारातूनच पलायन केल्याची घटनेनं एकच खळबळ उडाली. या घटनेत कारागृहातील सुरक्षा यंत्रणेचे पूर्णपणे वाभाडे निघाल्याचे पाहायला मिळत आहे.

जाहिरात

एवढा कडेकोट बंदोबस्त असताना अशा प्रकारची घटना कशी घडू शकते. तिघे कैदी मुख्य प्रवेशद्वारच्या तुरूगरंक्षकाच्या कार्यालयात गेलेच कसे? तसंच पिस्तुल त्यांच्याकडे आले कोठून हा विषय विचार करण्यासारखा आहे. शहरातच्या स्वातंत्र्य चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दुचाकीचालक आणि तीन कैदी कैद झाले आहेत. दिवसभर याबाबत विविध चर्चा आणि तर्कवितर्क होतांनाचे अनेक ठिकाणी दिसून आले. याला म्हणता क्वालिटी! टाटाच्या नॅनोला भिडली होंडा सिटी, पण तोंडच चेपले, VIDEO या घटनेत पलायन केलेल्या आरोपींमध्ये एक खुनातील तर दोन जण दरोड्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. पुणे येथील सराफ व्यापाऱ्याच्या पेढीवर सशस्त्र दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपी सुशील मगरे हा पोलीस दलातील बडतर्फ कर्मचारी असल्याची माहिती समोर येत आहे. पलायन केलेल्या आरोपीमध्ये सुशील मगरे, गौरव पाटील आणि सागर पाटील हे तीन आरोपी आहेत. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कारागृहाला भेट देत त्या ठिकाणच्या सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेऊन पलायन केलेल्या आरोपींचा शोध घेण्यास विविध पथके रवाना केली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: jalgaon
  • First Published :
जाहिरात
जाहिरात