नवी दिल्ली, 26 जुलै: देशात कोरोनाचं थैमान सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासाठी आणि संसर्ग टाळण्यासाठी वेगवेगळ्या उपयोजना केल्या जात आहेत. लॉकडाऊन दरम्यान अनेकांना लग्न सोहळा रद्द करावा लागला तर काही जणांनी आटोपशीरपणानं लग्न उरकलं पण या अनलॉकच्या टप्प्यात अनोखा लग्न सोहळा पार पडला आहे. आंध्र प्रदेशात पार पडलेल्या एका लग्न सोहळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता हॉलवर आलेल्या पाहुण्यांना जेवण वाढण्यासाठी वेटर पीपीई सूट घालून आल्याचं पाहायला मिळालं. कोरोनाचं संक्रमण टाळण्यासाठी वधू-वर दोन्हीकडून विशेष काऴजी घेण्यात आली आहे. लग्न समारंभासाठी 50 हून अधिक लोकांना सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे. आंध्र प्रदेशात एका लग्न सोहळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या लग्नसोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगचं पालन लोकांनी केल्याचंही पाहायला मिळालं.
#Catering service during #CoronavirusPandemic: Servers in #PPE kits cater to hungry guests at #wedding in #AndhraPradesh’s Krishna district pic.twitter.com/ILsc1sN9zU
— Pratiba Raman (@PratibaRaman) July 25, 2020
हे वाचा- भारतात एकाच दिवसात 64% रुग्ण बरे; वाढत्या आकड्याला घाबरू नका कोरोनाला हरवणं शक्य
हे वाचा- मुंबईतून चिंताजनक माहिती, एकाच वेळी 29 मतिमंद मुलांना कोरोनाची लागण मिळालेल्या माहितीनुसार 22 जुलै रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात मुदिनेपल्ली गावात अनोखा लग्नसोहळा पार पडला. लग्न समारंभाच्या जेवणासाठी कॅटर्ससाठी ऑर्डर देण्यात आली होती. यावेळी कोरोना व्हायरसचं संक्रमण आणि संसर्ग टाळण्यासाठी वेटरर्सनी पीपीई सूट घालून लोकांना जेवायला वाढलं. या लग्न समारंभात साधारण 200 हून अधिक लोकांची व्यवस्था ठेवण्यात आली होती. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी या लग्नसोहळ्यात लोकांना सोशल डिस्टन्स ठेवून बसवण्यात आलं होतं. आंध्र प्रदेशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 80 हजारवर पोहोचला आहे. 933 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 39 हजार 935 रुग्णांनी कोरोनाविरुद्ध लढाई जिंकली आहे.त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे.