Home /News /viral /

अद्भुत! कोरोना सोडा इथं आली चक्क हरणांची लाट; दुर्मिळ VIDEO पाहण्याची संधी सोडू नका

अद्भुत! कोरोना सोडा इथं आली चक्क हरणांची लाट; दुर्मिळ VIDEO पाहण्याची संधी सोडू नका

एकाच वेळी रस्त्यावर धावताना दिसली हजारो हरणं.

    अहमदाबाद, 28 जुलै: कोरोनामुळे आपण कित्येक दिवसांपासून आपण लॉक झालो आहोत. मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप हेच आता काय ते आपलं विश्व आहे. फिरण्याचा आनंद तर घेताच येत नाही आहे. असो पण घरबसल्यासुद्धा निसर्गाचा अद्भुत नजारा पाहण्याची संधी मात्र बिलकुल सोडू नका. असाच एक गुजरातमधील सुंदर व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ज्यात एकाच वेळी हजारो हरण (Deer) एकत्र एकाच रांगेत धावताना (Deer running together) दिसत आहे. भावनगरच्या (Bhavnagar Deer) वेलावदारमधील राष्ट्रीय मृग अभयारण्यातील (Bhavnagar blackbuck national park) एक व्हिडीओ (Deer video) सध्या समोर आला आहे. जिथं एकाच वेळी हजारो हरणं एकत्र दिसली. हे दृश्यं मनाला भावणारं असं आहे. या अभयारण्यात आणि बाहेरील क्षेत्रात अशी एकूण 7500 पेक्षा जास्त हरणं आहेत. हरणांच्या कळपांचं दर्शनही इथं अधूनमधून होतं. पण हरणांचा असा कळप मात्र तुम्हाला क्वचितच पाहायला मिळेल. रस्ताच्या एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाणारी ही हरणं. रस्ता ओलांडताना दुडूदुडू पळत आहेत. हे वाचा - नवरी जोमात नवरदेव कोमात! लाजणं दूर नववधूने मंडपातच ऐटीत तोंडातून सोडला धूर जंंगलात किंवा नॅशनल पार्कमध्ये फिरायला गेल्यानंतर एखादा वाघ, सिंह, बिबट्या असे प्राणी पाहायला मिळावेत असं वाटतंच. पण सुंदर आणि गोंडस हरणांकडेही आपल्या नजरा टिकून असतात. अशी एक-दोन हरणं जरी दिसली तरी मनाला कसं प्रसन्न वाटतं. मग असा हरणांचा कळप पाहिला तर मग तर काय विचारूच नका. हे वाचा - पुढच्या वर्षी पृथ्वीवर येणार एलियन्स? 'टाइम ट्रॅव्हलर'चा भयावह दावा या हरणांना असं पळताना पाहून एखादी लाटच आली असं दिसतं. ही लाट पाहिल्यानंतर तुमच्या मनातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती मात्र नक्कीच दूर झालेली असेल.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Deer, Gujrat, National park, Viral, Viral videos, Wild animal

    पुढील बातम्या