Home /News /viral /

नवरी जोमात नवरदेव कोमात! लाजणं राहिलं दूर नववधूने मंडपातच ऐटीत तोंडातून सोडला धूर

नवरी जोमात नवरदेव कोमात! लाजणं राहिलं दूर नववधूने मंडपातच ऐटीत तोंडातून सोडला धूर

नवरीला लग्नातच असं करताना पाहून नवरदेवही घाबरतो.

  मुंबई, 28 जुलै: कितीही बिनधास्त तरुणी असली तरी आपल्या लग्नात (Wedding) मात्र तिच्या चेहऱ्यावर लाजणं दिसतंच. अगदी गालातल्या गालात हसणं, हळूच नजर वर करून चोरून पाहणं अशीच नवरी (Bride) दिसते. आयुष्यभर अगदी बिनधास्तपणे वावरलेल्या मुलीही नवरी होतात तेव्हा  गोड लाजताना दिसतात. पण सध्या सोशल मीडियावर (Social media viral video) अशा नवरीचा (Bride video) व्हिडीओ व्हायरल (Bride viral video) होतो आहे, जी लाजणं तर दूर अगदी भरमंडपातच ती सर्वांसमोर तोंडातून ऐटीत धूर (Bride smoke) सोडते आहे. तोंडातून धूर सोडणाऱ्या या नववधूची चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे. नववधूला असं तोंडातून धूर सोडताना पाहताच नवरदेवही हैराण झालं. नवरीचं असं रूप पाहून तिच्या सासरची मंडळीही गार झाली. लग्नाचा (Wedding video) हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
  व्हिडीओत पाहू शकता, नवरा-नवरी एकत्र जेवायला बसले आहेत. नवरी तोंडातून सर्वांसमोर धूर सोडताना दिसते आहे. नवरी अगदी बिनधास्त आहे, तिला कोणतीही भीती वाटत नाही. पण नवरीला लग्नात असं करताना पाहून नवरदेव मात्र थोडा घाबरलेला, बावरलेला दिसतो आहे. तो नवरीला इशाऱ्याने असं करण्यापासून रोखतो. मग नवरी हळूच हसते आणि आपल्या नवऱ्याचं ऐकून गप्प बसते. हे वाचा - काहीही! नवऱ्याला मंडपातच नवरीला द्यावी लागते इनरविअर; लग्नाची विचित्र परंपरा असं पाहिलं तर कुणालाही वाटेल की हा सिगारेटचा धूर आहे. पण तिच्या हातात सिगारेट नाही आहे. मग हा धूर कुठला? व्हिडीओ नीट पाहिल्यावर त्या धुरामागील नेमकं सत्य समजतं. ती असा पदार्थ खाते ज्यातून धूर निघतो आहे. हा पदार्थ तोंडात घेतल्यानंतर नवरी तो धूर बाहेर असा फेकते, पण पाहताना असं वाटतं की तिच्या तोंडातून निघणारा धूर हा सिगारेटचा आहे आणि त्याच तोऱ्यात ती धूर सोडते. हे वाचा - गोलगप्पा खाने का स्ट्रगल तुम क्या जानो गे...! नाकात नथ, पाणीपुरीसाठी नवरीची धडपड लग्न म्हटलं की त्यात अशी बरीच मजा-मस्ती आली. तशाच व्हिडीओपैकी हा एक आहे. हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस पडत आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Bride, Bridegroom, Viral, Viral videos, Wedding, Wedding video

  पुढील बातम्या