वॉशिंग्टन, 28 जुलै : एक रिटायर आर्मी ऑफिसर घरात एकटाच राहत होता. पण दररोज रात्र झाली की त्याच्या बेडवर कुणीतरी यायचं. याची माहिती त्या अंध व्यक्तीलाही नव्हती. पण एक दिवस त्या व्यक्तीला संशय आला आणि तिने केअरटेकअरला पाहायला सांगितलं. केअरटेकरला जे दिसलं ते पाहून त्याच्या अंगावर अक्षरशः काटा आला. त्या धक्कादायक दृश्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अमेरिकेच्या अर्कान्सासमधील ही घटना आहे. इथल्या रिटायटर आर्मी ऑफिसरच्या घरातील ही भयानक घटना आहे. या अधिकाऱ्याची दृष्टी गेली होती. घरात तो एकटाच राहत होता. रात्री तो झोपायला गेली की बेडवर तिला कुणीतरी चावायचं. त्यामुळे त्याला झोपही येत नव्हती. अनेक महिन्यांपासून असंच सुरू होतं. पण त्याचं नेमकं कारण त्याला समजेना.
एक दिवस न राहवून त्याने आपल्या केअरटेकरला याबाबत सांगितलं. केअरटेकरने त्याचा बेड तपासला आणि बेडखाली जे दिसलं ते पाहून त्याला धक्काच बसला. लेकीच्या लग्नाआधी आईची विचित्र इच्छा! मुलीला 100 तरुणांसोबत करायला लावलं ‘हे’ काम; दिले 40 हजार तो अधिकारी ज्या बेडवर झोप होता, त्या बेडवर हजारो ढेकूण होते. ढेकूण हे सहसा फर्निचरमध्ये आढळून येतात. दिवसभर किंवा प्रकाशात ते गायब होतात. पण रात्री किंवा अंधारात ते बाहेर येतात. त्यांच्या संपर्कात एखादी व्यक्ती आली की त्या व्यक्तीला चावून तिचं रक्त शोषून घेतात. या व्यक्तीच्या बेडखाली असलेले हे ढेकूणही रात्रीच्या वेळी अंधार झाला की बाहेर पडत असतं आणि त्याला चावत असतं. अखेर पेस्ट कंट्रोलला बोलावण्यात आलं. या व्यक्तीच्या बेडवरील या ढेकूणांचा व्हिडीओ एका पेस्ट कंट्रोलच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. हॉटेल रुममध्ये ‘ही’ वस्तू दिसली तर लगेच सावध व्हा, ती सामान्य नाही तर एक छुपा कॅमेरा naturalstatepest नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील हा व्हिडीओ. ज्यात या संपूर्ण घटनेची माहितीही देण्यात आली आहे.
पेस्ट कंट्रोल टीमनेही आजपर्यंत इतके ढेकूण पाहिले नव्हते. पथकाने तात्काळ पेस्ट कंट्रोल केलं आणि या माजी अधिकाऱ्याला नवीन बेडही गिफ्ट म्हणून दिला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.