जाहिरात
मराठी बातम्या / Viral / लेकीच्या लग्नाआधी आईची विचित्र इच्छा! मुलीला 100 तरुणांसोबत करायला लावलं 'हे' काम; दिले 40 हजार

लेकीच्या लग्नाआधी आईची विचित्र इच्छा! मुलीला 100 तरुणांसोबत करायला लावलं 'हे' काम; दिले 40 हजार

प्रतीकात्मक फोटो - Canva

प्रतीकात्मक फोटो - Canva

एका महिलेने तिच्या आई आणि बहिणीचा हा अजब असा किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

लंडन, 28 जुलै :  मुलीचं लग्न हा प्रत्येक आईच्या आयुष्यातील सर्वात अनमोल असा क्षण असतो. तिचं लग्न ठरवल्यावर ती माहेर सोडून सासरी जाणार याचं दुःख तर तिला असतंच पण सासरी जाऊन तिच्याकडून काही चूक होऊ नये, तिला काही गोष्टी यायला हव्यात याची जबाबदारीही आईवर असते. त्यामुळे ती लग्न ठरताच लेकीला अगदी स्वयंपाकापासून रितीभातीपर्यंत सर्वकाही शिकवते. पण सध्या एक अशी आई चर्चेत आली आहे जिने तिच्या लेकीचा लग्नाआधी हजारो रुपये दिले आणि 100 तरुणांसोबत एक काम करायला लावलं. यूकेतील हे अजब प्रकरण आहे. इथं राहणारी एलिस कॅरोलिनने नावाची महिला, जी तिच्या सोशल मीडिया टिकटॉकवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील आणि कुटुंबाशी संबंधित अनेक किस्से सांगितले आहे. यापैकीच तिची बहीण आणि आईचा हा किस्सा आहे.

News18लोकमत
News18लोकमत

तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिचं कुटुंब सेलिब्रेशन करताना दिसत आहे. कुटुंबाने दोन केक ऑर्डर केले आहेत. एका केकवर 100 मेणबत्त्या लावल्या आहेत. तर दुसऱ्याल YAY असं लिहिलं आहे.   कॅप्शनमध्ये जेव्हा तुमची आई तुमच्या बहिणीला लग्नापूर्वी 100 वेगवेगळ्या मुलांसोबत 100 डेटवर जाण्यासाठी $500 देते, असं लिहिलं आहे. तिनं बहिणीला तिच्या फोनवर तिने डेट केलेल्या तरुणांची यादी स्क्रोल करतानाही दाखवलं आहे. व्हिडीओत तिने तिच्या बहिणीचा चेहरा दाखवला नाही, तिचं नावही सांगितलं नाही. Weird Tradition : इथं घराबाहेर लावावा लागतो बायकोचा फोटो; कारण… तुम्हाला आश्चर्य वाटेल पण तिच्या आईचीच तशी इच्छा होती. लग्नाआधी आपल्या मुलीने 100 तरुणांना तरी डेट करावं.  तिने सांगितल्यानुसार तिच्या आईने तिच्या बहिणीला 500 डॉलर्स म्हणजे जवळपास 40 हजार रुपये दिले. आणखी पैसे लागले तर तेसुद्धा मागून घे असं तिनं सांगितलं आणि तिने तिला 100 पुरुषांसोबत डेटवर जाण्यासाठी प्रोत्साहित केलं. आईची इच्छा पूर्ण झाल्यावर हे सेलिब्रेशन करण्यात आळं आहे. एलिस म्हणाली, तिच्या बहिणीला डेट करण्यासाठी काही वर्षे लागली. पण तिने एकही पैसा खर्च केला नाही. संपूर्ण $500 वाचवले.  दरम्यान तिच्या आईने असं का केलं, याचंही कारण तिनं दिलं आहे. आपल्या मुलीने सर्व तरुणांना भेटावं, त्यांच्याबद्दल जाणून घ्यावं. जेणेकरून लग्नानंतर पुरुषांबाबत तिच्या मनात भीती निर्माण होऱणार नाही. इतकाच तिच्या आईचा असं करण्यामागील उद्देश होता. Viral News : महिलेचा अजब छंद; इतरांच्या मुलांना देते जन्म, नवऱ्यालाही नाही आक्षेप या आईने मुलासाठी जे काही केलं, त्याबाबत अनेक युझर्सनी कौतुक केलं आहे. तुमच्या पालकांनी तुमच्यासाठी असं काही अजब केलं का, आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात