कोलकाता 31 मार्च : मुलांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आई कोणत्याही अडचणींचा सामना करण्यास तयार असते, असं म्हटलं जातं. अशीच एक घटना पश्चिम बंगालमधून (West Bengal) समोर आली आहे. यात एका व्यक्तीला त्याची आवडती स्कूटी खरेदी करायची होती. यासाठी त्याच्या आईने भीक मागून नाणी गोळा केली आणि मग आपल्या मुलाचं स्वप्न पूर्ण केलं. अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी केरळमधील सेलममध्येही पाहायला मिळाली होती, ज्यात एक व्यक्ती बाईक घेण्यासाठी 1 रुपयांची 2.6 लाख नाणी घेऊन शोरूममध्ये पोहोचला होता. काय म्हणावं यांना! एकाच वर्षात 3 मुलांचे आईबाबा झाले; आता चौथ्या बाळाच्या स्वागताची तयारी अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. ही बातमी पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील आहे. इथे एका तरुणाने मोठ्या बादल्यांमध्ये 80 हजार रुपयांची नाणी गोळा केली आणि तो जवळच्या शोरूममध्ये पोहोचला (Man Buys Dream Scooty Worth Rs 80 thousand Using Coins). त्याने शोरूममध्ये ही नाणी देऊन स्कूटी खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करताच शोरूममधील कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र चांगली गोष्ट म्हणजे शोरूमने नाण्यांच्या बदल्यात राकेश पांडे नावाच्या तरुणाला स्कूटी देण्याचं मान्य केलं. शोरूमचे कर्मचारी जमिनीवर बसून नाणी मोजू लागले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राकेश दुसऱ्या राज्यात जाऊन मजूर म्हणून काम करतो, तर त्याची आई भीक मागून उदरनिर्वाह करते. आपल्या मुलाचं स्वप्न साकार करण्यासाठी आई भीक मागून नाणी गोळा करत होती. मुलाने मजुरी केली, तर आईने भीक मागून 80 हजार रुपये गोळा केले. यानंतर राकेश हे पैसे घेऊन शोरूममध्ये पोहोचला आणि त्याचं स्वप्न साकार झालं. खांद्यावर टॅटू गोंदवण्यासाठी गेलेली तरुणी; आर्टिस्टने केलेला कांड पाहून संतापली शोरूममध्ये उपस्थित असलेल्या व्यवस्थापकाने सांगितलं की, ‘या घटनेपूर्वी त्याने ग्राहकांकडून 10 ते 12 हजारांपर्यंतची नाणी घेतली होती. मात्र, यावेळी वेगळा अनुभव आला. या प्रकरणी मॅनेजर म्हणाले, ‘एका आईने ज्याप्रकारे दुःख सहन करून आपल्या मुलासाठी पैसे उभे केले, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. भविष्यातही आमच्याकडून शक्य होईल ती मदत तरुणाला करू.’ राकेशने सांगितलं की, त्याने ही स्कूटी आईसाठी खरेदी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.