जाहिरात
मराठी बातम्या / Viral / अजबच! हा नारंगी रंगाचा फायरफॉल वाहतो उंच पर्वतावरून, पाहण्यासाठी लोक येतात जगभरातून

अजबच! हा नारंगी रंगाचा फायरफॉल वाहतो उंच पर्वतावरून, पाहण्यासाठी लोक येतात जगभरातून

अजबच! हा नारंगी रंगाचा फायरफॉल वाहतो उंच पर्वतावरून, पाहण्यासाठी लोक येतात जगभरातून

तुम्ही झरा पाहिला असेल, पण नारिंगी रंगाचा झरा कधी पाहिलाय का?

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 22 मार्च : अमेरिकेच्या योसेमाइट व्हॅलीमध्ये असलेल्या एका झऱ्याचे फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या झऱ्यात असं आहे तरी काय? तर, हा झरा पाण्यानं बनलेला नाही. (America news) या झऱ्यात वाहणारी गोष्ट लाव्हा असल्याचं सांगितलं जात आहे. या लाव्ह्यानं झऱ्याला नारंगी रंग दिला आहे. नॅशनल पार्क सर्व्हिसचं म्हणणं आहे, असं फेब्रुवारीत होतं. (Yosemite waterfall) इथल्या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी 2 आठवड्यात झरा मागून येणाऱ्या सूर्याच्या किरणांमुळं चकाकत्या नारिंगी रंगाचा दिसतो. (Yosemite waterfall of America) ऑनलाईन बुकिंगनंतर पाहू शकाल झरा योसेमाइट व्हॅलीमध्ये 2 हजार फुटांचा झरा पाहण्यासाठी यावर्षी लोक इथे येऊ शकत नाहीत. कोरोनामुळं ऑनलाईन बुकिंग केल्यावर एका विशिष्ट संख्येतच लोकांना इथं प्रवेश मिळतो आहे. दरवर्षी इथं येणाऱ्या लोकांची संख्या कमी कमी केली जाते आहे. हेही वाचा VIDEO: मुंबईत मास्क न घातल्यानं दंड मागितला असता महिलेची मार्शलला जबरदस्त मारहाण माध्यमांच्या वृत्तानुसार, इथं पर्यटक आणि फोटोग्राफर्सची संख्या जास्त असल्यानं कातळांना नुकसान होतं आहे. यासाठी ही संख्या मर्यादित केली गेली आहे. (Yosemite orange waterfall)

हिवाळा आणि वसंत ऋतूमध्ये सौंदर्य पाहण्यासारखं नॅशनल पार्क सर्व्हिसच्या मते हा झरा हिवाळा आणि वसंत ऋतूमध्ये पाहण्यासारखा असतो. ऋतू योग्य असेल तर सूर्याची किरणं झऱ्यावर पडतात. त्याचं सौंदर्य अजूनच झळाळून जातं. अनेकदा पर्यटक हे दृश्य पाहण्यासाठी पोहोचतात. मात्र असं काही दिसत होत नाही तेव्हा ते नाराज होतात. (Yosemite waterfall like lava) हेही वाचा प्रसिद्ध शेफच्या मुलीनं प्रॅंकच्या नावावर केली विचित्र गोष्ट, व्हायरल झाला VIDEO संध्याकाळी वाढतं सौंदर्य इथल्या झऱ्याला पाहण्याचा सर्वात चांगला वेळ संध्याकाळची असते. यावेळी आकाश स्वच्छ असतं. आकाशात काही ढग असतील तर सूर्याची किरणं थेट इथं पोचत नाहीत. अशावेळी हे नारिंगी रंगाचं सौंदर्य बघायला मिळत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात