जाहिरात
मराठी बातम्या / Viral / या प्रसिद्ध शेफच्या मुलीनं प्रॅंकच्या नावावर केली ही विचित्र गोष्ट, व्हायरल VIDEO पाहून तुम्ही म्हणाल काय हे?

या प्रसिद्ध शेफच्या मुलीनं प्रॅंकच्या नावावर केली ही विचित्र गोष्ट, व्हायरल VIDEO पाहून तुम्ही म्हणाल काय हे?

या प्रसिद्ध शेफच्या मुलीनं प्रॅंकच्या नावावर केली ही विचित्र गोष्ट, व्हायरल VIDEO पाहून तुम्ही म्हणाल काय हे?

सोशल मीडियावर प्रॅंक हा एक लोकप्रिय प्रकार. हे एक प्रॅंक मात्र थोडं विचित्रच आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 मार्च : सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडीओज व्हायरल होत असतात. त्यातलाच एक प्रकार म्हणजे प्रॅन्क व्हिडिओज. लोक एकमेकांसोबत विविध प्रकारचे प्रॅन्क्स करत असतात. (social media prank) अनेकदा तर लोक असं काही प्रॅन्क करतात ज्याच्यामुळं खूप चिडचिड, संताप होतो. अनेकदा तर आपल्याला या प्रॅन्कवर विश्वासच बसत नाही. सध्या अशाच एका प्रॅन्कचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तो पाहून तुम्ही विचार कराल, की अशा प्रॅन्कपासून दूर राहिलेलंच बरं. (prank by chef Gordan Ramsay daughter) हा व्हिडिओ आहे जगातले प्रसिद्ध शेफ गॉर्डन रामसे यांचा. तुम्ही यांना अनेक टीव्ही शोजमध्ये पाहिलं असेल. सोशल मीडियावर यांचा जो व्हिडिओ व्हायरल होतो आहे, तो आहे गॉर्डन रामसे आणि त्यांची मुलगी टिली रामसे यांचा. हेही वाचा ब्लॅक पँथर आणि बिबट्याचा रंगला सामना, नंदन निलेकणींनी शेअर केला भन्नाट VIDEO टिली एक प्रॅन्क करते आहे. हा व्हिडिओ गॉर्डन रामसे यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. (Gordan Ramsey daughter funny prank)

जाहिरात

यात त्यांच्या मुलीनं त्यांच्यासोबत असा काही प्रॅन्क केला आहे, की काही वेळ गॉर्डन बुचकळ्यात पडले, की हे नक्की काय झालं? आणि विशेष म्हणजे, हे प्रॅन्क जर त्यांच्याऐवजी दुसऱ्या कुठल्या वडिलांसोबत झालं असतं तर ते नक्कीच चिडले असते. या व्हिडिओला गॉर्डन यांनी कॅप्शन दिलं आहे, ‘काल रात्री कुणीतरी आमच्या रामसेंच्या घरी भांडी धुवून टाकली.’ या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखहून जास्त लाईक्स मिळाले आहेत. (viral video of eggs and bottle prank) हेही वाचा मार्च एण्डिंग आलं… ऑफिसमध्ये जाणारे नोकरदार नसाल तरी पाहाच हा मजेदार VIDEO या व्हिडिओत गॉर्डन यांची मुलगी त्यांच्यासोबत बसली आहे. आणि टेबलावर तिनं एका बाटलीत पाणी भरून ठेवलं आहे. ती एका हातानं बाटली पकडते आणि एका हातात एक अंडा. गॉर्डन एका बाटलीत वाकून पाहतात. अचानक त्यांची मुलगी बाटलीला दाबते. पाणी गॉर्डन यांच्या तोंडावर पडतं. तोच ती तो अंडा गॉर्डन यांच्या डोक्यावर फोडते. असे प्रॅन्क नक्कीच कुणाला रागाला आणू शकतात. गॉर्डन मात्र कूल पद्धतीनं तिथंच बसून हसायला लागले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात