जाहिरात
मराठी बातम्या / Viral / ...आणि या अनोख्या लग्नात नवरीमुलीनेच करू दिलं नाही 'कन्यादान'

...आणि या अनोख्या लग्नात नवरीमुलीनेच करू दिलं नाही 'कन्यादान'

...आणि या अनोख्या लग्नात नवरीमुलीनेच करू दिलं नाही 'कन्यादान'

तपस्याने आपल्या वडिलांना सांगितलं की, ‘मी दान करण्याची गोष्ट नाही. तुमची मुलगी आहे.’ तिने लग्नात कन्यादानाचा विधीच करू दिला नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

इंदूर, 18 डिसेंबर : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) नरसिंहपूर जिल्ह्यात जोबा गावातील एका महिला IAS अधिकारी आणि IFS अधिकाऱीचं लग्न संपन्न झालं. सध्या या लग्नाची मोठी चर्चा सुरू आहे. आयएएस तपस्या परिहार ही UPSC च्या परीक्षेत 23 वी रँक मिळवून उत्तीर्ण झाली आहे. तिने IFS अधिकारी गर्वित गंगवारसोबत लग्न केलं. तपस्या परिहारचं लग्न सध्या चर्चेचा विषय़ ठरला आहे. तिच्या लग्नामुळे एक नव्या विषयाचा वाचा फुटली आहे. आतापर्यंत समाजातील अनेक नियम हे स्त्रीयांवर अन्याय करणारे होते, वेळोवेळी सुधारकांनी लढा देऊन त्या बदलही घडवून आणला. मात्र अद्यापही सुरू असलेल्या काही सुप्त प्रथांचा सध्याच्या महिलांकडून विरोध केला जात आहे. अशीच एक घटना मध्य प्रदेशात घडली.  तपस्याने आपल्या लग्नात कन्यादान या प्रथेला नकार दिला. तपस्याने आपल्या वडिलांना सांगितलं की, मी दान करण्याची गोष्ट नाही. तुमची मुलगी आहे. तिने लग्नात कन्यादानाचा विधीच केला नाही. गुरुवारी जोवा गावात या लग्नाचं रिसेप्शन पार पडलं. यावेळी दोन्ही पक्षांचे नातेवाईक उपस्थित होते. हे ही वाचा- पहिल्याच NDA प्रवेश परीक्षेत महिलांचा यशस्वी झेंडा, 1002 महिलांना यश महिला IAS अधिकारीने लग्नात कन्यादान विधीच केला नाही.. हिंदू संस्कृतीनुसार, कन्यादानाचं विशेष महत्त्व मानलं जातं. मात्र नरसिंगपूर जिल्ह्यात जन्माला आलेल्या तपस्या परिहारने सर्व बंधनं तोडली. आणि आपल्या लग्नात कन्यादानाचा विधी होणार नसल्याचं ठामपणे सांगितलं. त्यामुळे हे लग्न सध्या चर्चेत आहे. आयएएस अधिकारी तपस्या सांगते की, लहानपणापासून तिला या विधीबद्दल आक्षेप होता. कोणी कसं माझं दान करू शकतं, तेही माझ्या इच्छेशिवाय असे अनेक प्रश्न तिला सतावत होते. यानंतर हळूहळू ती आपल्या कुटुंबासोबत याविषयावर चर्चा करू लागली. विशेष म्हणजे कुटुंबालाही तिचं म्हणणं पटलं. यानंतर ती वर पक्षाशी याबद्दल बोलली. त्यांनाही हे पटलं आणि तिच्या लग्नात कोणीही तिचं दान केलं नाही. तपस्याचे विचार प्रगल्भ… तपस्या म्हणते की दोन्ही कुटुंब एकत्र येऊन लग्न करतात. त्यामुळे लहान-मोठं असं काही नसतं आणि असं असूही नये. कशाला कोणाचंही दान करायचं? दुसरीकडे तपस्याचे पती IFS गर्वित सांगतात की, कोणत्याही मुलीला लग्नानंतर पूर्णपणे बदलावं लागतं. मग विविध प्रकार आपण विवाहित असल्याचं दाखवावं लागतं. असे विधी पुरुषांसाठी नसतात. त्यामुळे अशा प्रकारच्या विधी वा विचार लांब ठेवायला हवा. तपस्याचे वडीलदेखील या लग्नामुळे खूष आहेत. त्यांना वाटतं की, अशा प्रकारच्या विधी मुलीला वडिलांच्या घरातून आणि त्यांच्या संपत्तीतून बाहेर करण्याचा मोठा कट आहे. हे लग्न वैदिक पद्धतीने पार पडलं, केवळ कन्यादान सारखा विधी करण्यास दोघांनीही नकार दिला. .

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात