मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

पहिल्याच NDA प्रवेश परीक्षेत महिलांचा यशस्वी झेंडा, 1002 महिलांना यश

पहिल्याच NDA प्रवेश परीक्षेत महिलांचा यशस्वी झेंडा, 1002 महिलांना यश

राष्ट्रीय संरक्षण अकादमी अर्थात एनडीएमध्ये (National Defence Academy) प्रवेश घेण्यासाठी यंदा प्रथमच महिलांना परवानगी मिळाल्यानंतर पहिल्याच प्रवेश परीक्षेत तब्बल 1002 महिलांनी यश मिळवलं आहे. एकूण 8000 जण या परीक्षेत यशस्वी झाले आहेत.

राष्ट्रीय संरक्षण अकादमी अर्थात एनडीएमध्ये (National Defence Academy) प्रवेश घेण्यासाठी यंदा प्रथमच महिलांना परवानगी मिळाल्यानंतर पहिल्याच प्रवेश परीक्षेत तब्बल 1002 महिलांनी यश मिळवलं आहे. एकूण 8000 जण या परीक्षेत यशस्वी झाले आहेत.

राष्ट्रीय संरक्षण अकादमी अर्थात एनडीएमध्ये (National Defence Academy) प्रवेश घेण्यासाठी यंदा प्रथमच महिलांना परवानगी मिळाल्यानंतर पहिल्याच प्रवेश परीक्षेत तब्बल 1002 महिलांनी यश मिळवलं आहे. एकूण 8000 जण या परीक्षेत यशस्वी झाले आहेत.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 17 डिसेंबर : राष्ट्रीय संरक्षण अकादमी अर्थात एनडीएमध्ये (National Defence Academy) प्रवेश घेण्यासाठी यंदा प्रथमच महिलांना परवानगी मिळाल्यानंतर पहिल्याच प्रवेश परीक्षेत तब्बल 1002 महिलांनी यश मिळवलं आहे. एकूण 8000 जण या परीक्षेत यशस्वी झाले आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC) ही परीक्षा घेतली जाते. यंदा 14 नोव्हेंबर रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती आणि परीक्षेचा निकाल 15 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला.

या परीक्षेत यशस्वी झालेल्या एकूण 8000 उमेदवारांपैकी 1002 महिला उमेदवार असल्याची माहिती न्यूज 18 ला मिळाली आहे. या यशस्वी महिला उमेदवार आता सर्व्हिस सिलेक्शन बोर्डसमोर (Service Selection Board) जातील, तसंच त्यांची वैद्यकीय चाचणी होईल. त्यानंतर त्यातील 19 जणींची एनडीएच्या पुढच्या वर्षीच्या कोर्ससाठी निवड होईल. या महिला पुढे जाऊन लष्कर, नौदल आणि वायुदलात अधिकारी (Army, Navy, Air Force) म्हणून नियुक्त होतील. पहिल्याच वर्षी एनडीएमध्ये सुमारे वीस महिला उमेदवारांची निवड होईल, असं वृत्त सर्वप्रथम न्यूज 18नेच दिलं होतं.

पुढच्या वर्षी एनडीएमध्ये एकूण 400 कॅडेट्सना प्रवेश दिला जाईल. त्यापैकी 10 महिलांसह 208 उमेदवारांची लष्करात भरती होईल. तीन महिलांसह 42 उमेदवारांची नौदलात भरती होईल. तसंच, 6 महिलांसह 120 उमेदवारांना भारतीय हवाई दलात नियुक्त केलं जाईल.

राज्यसभेत एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी अशी माहिती दिली, की या वर्षी एनडीएच्या (NDA Women Cadets) परीक्षेसाठी 5,75,856 जणांनी अर्ज केला होता. त्यापैकी 1,77,654 अर्ज महिलांचे होते.

शिक्षण सुरु असताना करिअरमध्ये प्रगती करायचीये? पार्ट टाइम जॉब्स ठरतील फायदेशीर

एनडीएमध्ये पुढच्या वर्षी प्रथमच महिलांना प्रवेश दिला जाणार आहे. त्या अनुषंगाने एनडीएकडून पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वाचे बदल केले जात आहेत. सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली असून, महिला प्रशिक्षक, महिला डॉक्टर्स, स्त्री-रोगतज्ज्ञ आणि अन्य महिला कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसंच, महिलांना प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने आवश्यक ते अन्य बदल आणि सुधारणाही संस्थेत केल्या जात आहेत.

पुण्यात खडकवासला येथे असलेल्या राष्ट्रीय संरक्षण अकादमीची स्थापना 1955 साली झाली. प्रत्येकी सुमारे 120 कॅडेट्सच्या 18 स्क्वाड्रन्सची या संस्थेची क्षमता आहे. संस्थेत सध्या सहा टर्म्सचे मिळून 2020 कॅडेट्स प्रशिक्षण घेत आहेत. आणखी दोन स्क्वाड्रन्स वाढवून प्रवेश क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने एनडीए प्रयत्नशील आहे.

MPSC क्षेत्राकडे नव्याने वळण्याआधी 'या' गोष्टींची माहिती घ्या!

12वीच्या परीक्षेनंतर एनडीएची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यास एनडीएत प्रवेश मिळू शकतो. सैन्यदलात नियुक्त होण्याआधीचं प्रशिक्षण कॅडेट्सना एनडीएमध्ये दिलं जातं. वर्षभरात होणाऱ्या चार एनडीए एंट्रन्स (NDA Entrance) आणि कंबाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झाम्सना (CDS) सहा लाखांहून अधिक उमेदवार अर्ज करतात. या परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जातात.

Career Tips: महिलांनो, एअर होस्टेसप्रमाणे ट्रेन होस्टेस म्हणूनही करू शकता करिअर

महिलांना आतापर्यंत एनडीएमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. त्यांना पुढच्या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेपासून प्रवेश दिला जावा, असं केंद्र सरकारचं म्हणणं होतं; मात्र सप्टेंबर महिन्यात सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला, की महिलांना यंदाच्या प्रवेश प्रक्रियेपासूनच प्रवेश दिला जावा.

आतापर्यंत लष्कर, नौदल आणि हवाई दलात नियुक्त झालेल्या महिला अधिकारी अनुक्रमे ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (चेन्नई), इंडियन नेव्हल अॅकॅडमी आणि एअर फोर्स अॅकॅडमी या संस्थांमधून प्रशिक्षण घेऊन येत होत्या. ग्रॅज्युएशननंतर त्यांना तिथे प्रवेश मिळत होता.

एनडीएत कोणत्याही वेळी 120 ते 150 महिला कॅडेट्स असाव्यात, या दृष्टीने नियोजन करण्यासंदर्भात चर्चा सुरू होती, अशी माहिती इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफचे माजी सहायक प्रमुख मेजर जनरल अरविंद भाटिया (निवृत्त) यांनी न्यूज 18 ला पूर्वी दिली होती.

First published:

Tags: NDA, Women