या विचित्र प्राण्यानं माणसांसोबत लुटला वॉटर सफारीचा आनंद, VIDEO झाला तुफान व्हायरल

या विचित्र प्राण्यानं माणसांसोबत लुटला वॉटर सफारीचा आनंद, VIDEO झाला तुफान व्हायरल

सोशल मीडियाचं जग चित्रविचित्र गोष्टींनी भरलेलं आहे. हा व्हिडिओ त्यापैकीच एक.

  • Share this:

मुंबई, 22 मार्च : सोशल मीडियावर (social media) बऱ्याचदा प्राणी-पक्ष्यांचे व्हिडिओज व्हायरल (viral video) होत असतात. लोकांनाही हे व्हिडिओ खूप आवडतात. आताही असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (viral video of strange wild animal) या व्हिडिओत एक विचित्र प्राणी वॉटर सफारीचा आनंद घेतो आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला एकदमच खास वाटेल. आपणही या प्राण्यासारखीच मस्ती करावी असं तुम्हाला वाटू लागेल. (strange animal enjoys water safari)

माणसांना पाण्यात खेळणं आणि धमाल करणं जसं आवडतं तसंच प्राण्यांनाही ते आवडतं. यात एक विचित्र दिसणारा प्राणी बोटीवर बसून मजा करताना दिसतो आहे. तो वाहत्या पाण्यातून पुढं जातो आहे.

हे वाचा - भयंकर! हातातल्या अजगराने डोळ्यावर अटॅक केला आणि... Shocking video viral

सोबतच आपला हात पाण्यात टाकून तो बोटीवर बसून एन्जॉय करतो आहे.  (animal in boat with human beings viral video)

25 सेकंदाच्या या क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक विचित्र जनावर बोटीवर बसून पाण्यासोबत मजा करतो आहे. या प्राण्याला स्लोथ म्हणून ओळखलं जातं. या व्हिडिओत दिसतो आहे, की हा प्राणी माणसांसह एका बोटीत बसून आनंद लूटतो आहे. व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी त्यावर प्रतिक्रिया द्यायला सुरू केल्या. (viral video of strange animal enjoying in water)

हे वाचा - अरे हे काय? एवढ्याशा कुत्र्याला घाबरून बिबट्यानेही ठोकली धूम; पाहा VIDEO

हा व्हिडिओ लोकांना इतका आवडतो आहे, की आतापर्यंत या व्हिडिओला 80 लाखांहून जास्त वेळा पाहिलं गेलं आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला अमेरिकेचे माजी व्यावसायिक खेळाडू रॅक्स चॅपमननं शेअर केलं आहे.

Published by: News18 Desk
First published: March 22, 2021, 3:42 PM IST

ताज्या बातम्या