मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /भयंकर! हातातल्या अजगराने डोळ्यावर अटॅक केला आणि... Shocking video viral

भयंकर! हातातल्या अजगराने डोळ्यावर अटॅक केला आणि... Shocking video viral

अजगराला हातात घेऊन ही व्यक्ती शूट करत होती, तेव्हा अजगराने (python) त्या व्यक्तीवर खूप वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

अजगराला हातात घेऊन ही व्यक्ती शूट करत होती, तेव्हा अजगराने (python) त्या व्यक्तीवर खूप वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

अजगराला हातात घेऊन ही व्यक्ती शूट करत होती, तेव्हा अजगराने (python) त्या व्यक्तीवर खूप वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

वॉशिंग्टन, 16 मार्च : साप (Snake) म्हटलं तरी कित्येकांच्या अंगाचं पाणीपाणी होतं आणि समोर प्रत्यक्षात साप दिसला तर मग बोलतीच बंद, अंगाला दरदरून घाम फुटतो. पण काही व्यक्ती अशा असतात ज्या सापांना हातात घेऊन अक्षरश: खेळवतात. पण अनेकदा त्यांना हे चांगलंच महागात पडतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (social media viral video) होतो आहे. ज्यामध्ये एका अजगराने (Python) थेट एका व्यक्तीच्या डोळ्यावर हल्ला केला आहे.

निक असं या व्यक्तीचं नाव आहे. त्याच्या सोशल मीडियावर त्याचे सापांसोबत असे बरेच व्हिडीओ पाहायला मिळतील. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा त्याच्या निक द रँगलर हे यूट्युब चॅनेलवरील आहे.  फ्लोरिडा शहरातील एव्हरग्लँड्स नॅशनल पार्कमधील हा व्हिडीओ आहे. जिथं निक एका खतरनाक सापासह शूट करत होता. त्यावेळी सापाने थेट त्याच्या डोळ्यावर हल्ला केला.

" isDesktop="true" id="531246" >

व्हिडीओत पाहू शकता निकने आपल्या हातात भलमोठा अजगर पकडला आहे आणि तो त्याची माहिती देतो आहे. या अजगराला बर्मा पायथॉन म्हटलं जातं. तो विषारी नसतो, असंही त्याने सांगितलं. त्यामुळे निकदेखील अगदी बेसावध आहे. बिनधास्तपणे तो सापाबाबत माहिती देताना दिसतो. निक सापाबाबत सांगत असतानाच साप त्याच्यावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला दंश करण्याचा प्रयत्न करतो आणि संधी साधून तो निकच्या थेट डोळ्यावरच अटॅक करतो.

हे वाचा - पर्यटकांच्या गाडीवर धावून आला अवाढव्य हत्ती आणि... धडकी भरवणारा VIDEO VIRAL

व्हिडीओत पुढे पाहू शकता सुदैवाने निकच्या डोळ्याला कोणतीही दुखापत झाली नाही. तर डोळ्याच्या वरच्या बाजूला सापाने चावा घेतला. तिथून रक्त वाहू लागलं.

निकनं हाच व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवरही शेअर केला आहे, ज्यात साप त्याला दुसऱ्यांदाही चावताना दिसतो, दरम्यान निकवर सापाने हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नाही. बऱ्याच वेळा त्याला साप चावले आहेत. सुदैवानं त्याला गंभीर दुखापत झालेली नाही.

First published:
top videos

    Tags: Python snake, Shocking viral video, Snake, Snake video, Viral, Wild animal