प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या, त्यांना अगदी सहजपणे हाताळणाऱ्या, कुरवाळणाऱ्या अनेक व्यक्ती असतात; पण सापांच्या (Snake) बाबतीत असं करणाऱ्यांची संख्या अगदीच कमी असते. कारण साप असा शब्द उच्चारल्यावरच अनेकांना धडकी भरते. साप, मग ते विषारी असोत की बिनविषारी किंवा लहान असोत वा मोठे, त्यांना पाहिल्यावर सर्वसामान्य व्यक्तींच्या अंगावरून भितीची एक शिरशिरी उठून जातेच. सापांना न घाबरणारे फार थोडे असतात आणि त्यातही सापांना सहजपणे हाताळणाऱ्यांची संख्या फारच कमी असते. त्यातले काही मोजकेच जण सापांशी अगदी सहजपणे खेळतातही. अशा मोजक्या व्यक्तींमध्ये समावेश होतो ब्रायन बार्सिझ्क (Brain Barczyk) यांचा. अलीकडेच त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर (Instagram Video) एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ते काही मोठ्या सापांसोबत (Giant Snakes) खेळतानाची दृश्यं दिसत आहेत.
सापांसोबत वावरताना किंवा अंगा-खांद्यावर खेळवताना ब्रायन अगदी कम्फर्टेबल दिसत आहेत. त्यांना ते चमच्याने भरवतानाही दिसत आहेत. त्या सापांनाही ब्रायन यांची भीती वाटत नसल्याचं या व्हिडिओतून जाणवत आहे. कारण ते बिनधास्तपणे ब्रायन यांच्या शरीराभोवती वेटोळी घालत आहेत आणि त्यांच्यासोबत खेळतही आहेत. हे साप आपल्या कुटुंबीयांप्रमाणेच आहेत, असं ब्रायन समजतात. एका मोठ्या सापाला उचलताना ब्रायन पूर्वीची एक आठवण सांगतात. पूर्वी ते त्या सापाला सहज उचलू शकायचे; आता मात्र त्याचं वजन खूपच वाढल्यामुळे त्याला उचलून खांद्यावर ठेवणं खूपच अवघड जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
हे ही वाचा-महिलेनं हातामध्ये पकडला भलामोठा किंग कोब्रा अन्..; अंगावर काटा आणणारा VIDEO
'माझ्याकडे असलेल्या सगळ्या मोठ्या सापांना मी एका क्लिपमध्ये दाखवू शकलो, याचा मला खूप आनंद आहे,' असं या इन्स्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये ब्रायन यांनी लिहिलं आहे. अनेक युझर्सनी ब्रायन यांच्या पोस्टवर धक्का बसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सापांबद्दल ब्रायन यांना वाटत असलेलं खरं प्रेम आणि ते घेत असलेली त्यांची काळजी याचं अनेकांनी कौतुक केलं आहे. 'स्नेकबाइट्सटीव्ही' या पेजवर 14 जुलै रोजी प्रसिद्ध झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत 23497 जणांनी पाहिला आहे. 2500हून अधिक जणांनी हा व्हिडिओ लाइक केला आहे.
View this post on Instagram
ब्रायन 1989पासून सर्पांचा संग्रह करतात. दी रेप्टाइल आर्मी (The Reptile Army) नावाची एक संघटनाही त्यांनी स्थापन केली आहे. अनेक सापांना त्यांनी जीवदान दिलं आहे. आपल्या या सापांबरोबरचे अनेक व्हिडिओ ब्रायन कायम सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या फॉलोअर्सकडून हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर लाइकही केले जात असतात.
ब्रायन यांचं सर्पप्रेम केवळ छंदापुरतं मर्यादित नाही. दी रेप्टारियम (The Reptarium) नावाच्या एका सर्पसंग्रहालयात (Reptile Zoo) ते कार्यरत आहेत. अमेरिकेतल्या मिशिगन (Michigan) राज्यातल्या उटिका नावाच्या शहरात ते सरपटणाऱ्या प्राण्यांचं संग्रहालय आहे. ते हजारो सरपटणाऱ्या प्राण्यांचं निवासस्थान आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Python snake, Shocking viral video