मराठी बातम्या /बातम्या /Viral /क्युट पांडा; हुबेहुब माणसासारखं खातो गाजर, VIDEO पाहून म्हणाल कमाल आहे!

क्युट पांडा; हुबेहुब माणसासारखं खातो गाजर, VIDEO पाहून म्हणाल कमाल आहे!

पांडाचे हावभाव, वागणं अगदी लहानांनाच नाही तर मोठ्यांनाही त्याच्या प्रेमात पाडतं.

पांडाचे हावभाव, वागणं अगदी लहानांनाच नाही तर मोठ्यांनाही त्याच्या प्रेमात पाडतं.

पांडाचे हावभाव, वागणं अगदी लहानांनाच नाही तर मोठ्यांनाही त्याच्या प्रेमात पाडतं.

मुंबई, 29 मार्च : निसर्गातले असंख्य जाती-प्रजातींचे प्राणी-पक्षी खूपच क्युट असतात. त्यांचं दिसणं, चालणं, आवाज, ते करत असलेल्या विविध कृती हे सगळं अतिशय आकर्षक असतं. त्यातलाच एक प्राणी म्हणजे पांडा. (viral video)

हे पांडा दिसायला अतिशय निरागस आणि गोड असतात. कुणाचंही लक्ष सहज त्यांच्याकडे वेधलं जातं. पांडा अगदीच लहान मुलांसारखं काय-काय गंमतीदार करत असतात. सोशल मीडियावर बऱ्याचदा पांडाजचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. यात पांडा जे करतो आहे ते पाहून तुम्ही त्याच्यावर एकदमच फिदा व्हाल. (cute panda video)

हा पांडा अगदी लहान मुलासारखा बसून गाजर खातो आहे. लोकांना हा व्हिडिओ खूपच आवडतो आहे. (viral video of cute panda)

हेही वाचा म्हावरा पकडायला गेला आणि जाळ्यात गावलं भलतंच... पाहून तुम्हालाही फुटेल घाम

सोशल मीडियावर हा व्हिडिओ @shoggy नावाच्या युझरनं शेअर केला आहे. हा व्हिडिओ खूप मजेदार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक पांडा गाजर घेऊन बसला आहे. आणि एखाद्या लहान मुलासारखा तो गाजर खातो आहे. (panda eating carrot video)

व्हिडिओ पाहताना असं वाटत आहे, की त्याला खूप भूक लागली आहे. (panda eats carrot like man video)

हेही वाचा दिवसरात्र हातात पुस्तक घेतलेला मुलगा नक्की काय वाचतो आहे? मजेदार VIDEO व्हायरल

15 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 17 हजाराहून जास्त लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ लोकांना खूप आवडतो आहे. व्हिडिओ पाहून लोकांनी त्यावर तऱ्हेतऱ्हेच्या कमेंट्सही केल्या आहेत.

First published:

Tags: Twitter, Viral video.