म्हावरा पकडायला गेला आणि जाळ्यात गावलं भलतंच... पाहून तुम्हालाही फुटेल घाम

म्हावरा पकडायला गेला आणि जाळ्यात गावलं भलतंच... पाहून तुम्हालाही फुटेल घाम

प्रत्येकवेळी मासेमारी करताना मजा येईल असं नाही, अनेकदा ही मासेमारी भयावहसुद्धा ठरू शकते.

  • Share this:

मुंबई, 27 मार्च : मासे (Fish) खायला अनेकांना आवडतं. त्यातही मासे (Fishing) स्वतः पकडलेले असतील तर मग ती खाण्याची मजा काही औरच. अनेक जण समुद्रात, नदीत मासे पकडायला जातात. काही जणांना नव्या प्रकारचे मासे मिळतात, काही जणांना अगदी एकच भलामोठा मासा मिळतो. या माशाला बाजारतही त्यांना चांगली किंमत मिळते. तर काही जणांना मासे नाही पण अशी एखादी वस्तू सापडते ज्यामुळे त्यांचं नशीबच बदलतं. पण प्रत्येकवेळी मासेमारी करताना सुखद अनुभव येईल असं नाही, अनेकदा ही मासेमारी भयावहसुद्धा ठरू शकते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral video) झाला.

मासेमारीचा एक असा व्हिडीओ समोर आला, जो पाहून त्या मच्छिमारालाच नाही तर तुम्हालाही घाम फुटेल. मासे पकडता पकडता मच्छिमाराच्या जाळ्यात असं काही अडकलं की त्याचा थरकाप उडाला. असं नेमकं त्या जाळ्यात अडकलं तरी काय?

व्हिडीओत बोटीवरील या व्यक्तीने नदीत मासे पकडण्यासाठी फास टाकला. काहीतरी जड त्या जाळ्यात अडकलं. एखादा मोठा मासा असावा किंवा खजिना असावा, असा आनंद त्या व्यक्तीला झाला. अलगदपणे त्याने जाळं वर खेचलं आणि पाहतो तर काय जाळ्यात छोट्या माशांचा खच नाही, मोठा मासाही नाही किंवा कोणता खजिनाही नाही तर चक्क होती एक मगर.

हे वाचा - दगड समजून चक्क मगरीवरून चालली कोंबडी; तोंडाजवळ येताच... VIDEO पाहून तुम्ही उडाल

मग काय मगर पाहूनच ती व्यक्ती घाबरली, थरथर कापू लागली, तिच्या हृदयाचे ठोके वाढले आणि दरदरून घाम फुटला. लगेच ती जाळी तशीच पुन्हा पाण्यात फेकली. जाऊ दे! आता ते मासेपण नको मला अशीच काहीशी प्रतिक्रिया या माणसाने दिली. कदाचित ही व्यक्ती आता कधीच पुन्हा मासे पकडण्याचा विचारही करणार नाही.

हे वाचा - OMG! छोट्याशा बेडकाची हिंमत तर पाहा; चक्क महाकाय सापावरच करतोय राइड; VIDEO VIRAL

आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. पण काही वेळानंतर त्यांनी हा व्हिडीओ डिलीट केला.  व्हिडीओ नाही पण हा फोटो पाहूनही तुम्हाला नक्कीच घाम फुटला असेल. पण तितकंच हसूही आलं असेल. कारण त्याच्या जाळ्यात असं काही येईल असा विचार सुरुवातीला तुम्हीही केला नसेल.

Published by: Priya Lad
First published: March 27, 2021, 8:03 PM IST

ताज्या बातम्या