मराठी बातम्या /बातम्या /Viral /

दिवसरात्र हातात पुस्तक घेतलेला हा मुलगा नक्की काय वाचतो आहे? मजेदार VIDEO VIRAL

दिवसरात्र हातात पुस्तक घेतलेला हा मुलगा नक्की काय वाचतो आहे? मजेदार VIDEO VIRAL

UPSC Preparation Video: पुस्तकी किडा कुणाला म्हणतात ते हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्की कळेल.

UPSC Preparation Video: पुस्तकी किडा कुणाला म्हणतात ते हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्की कळेल.

UPSC Preparation Video: पुस्तकी किडा कुणाला म्हणतात ते हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्की कळेल.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 28 मार्च : सोशल मीडियावर व्हायरल होणारे मजेदार व्हिडिओज सगळ्यांनाच आवडतात. काही क्षणातच मूड एकदम फ्रेश करण्याची क्षमता या व्हिडिओजमध्ये असते. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. (IFS officer funny video twitter)

यूपीएससीच्या मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच आला आहे. अनेक लोकांना या निकालामुळे आनंद झाला आहे. मात्र अनेक लोकांना हा निकाल पाहून दुःख झालं असेल. अनेकजण मात्र नाउमेद न होता पुन्हा एकदा तयारीला लागले असतील. ज्यांच्यामध्ये आपलं ध्येय गाठण्याची उर्मी असते ते काहीही करून सगळे अडथळे ओलांडतात. (UPSC preparation funny video)

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ आयएफएस अधिकाऱ्यानं शेअर केला आहे. (funny viral video of upsc aspirant)

हेही वाचा या विचित्र प्राण्यानं माणसांसोबत लुटला वॉटर सफारीचा आनंद, VIDEO झाला व्हायरल

या व्हिडिओत या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे, की स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे कशाप्रकारे अभ्यास करतात.

हा व्हिडिओ अधिकारी अवनीश शरण यांनी शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे 'सिव्हिल सर्व्हिसचा एक आदर्श उमेदवार' (upsc hard study funny video viral)

हा व्हिडिओ खूपच मजेदार आहे.

हेही वाचा बापरे! एक कप चहाची किंमत 1000 रुपये! चहाप्रेमींनी नक्की वाचा काय आहे खासियत

व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, की मुलगा पुसट घेऊन अभ्यास करतो आहे. त्याच्या हातात सतत पुस्तक दिसतं आहे. अगदी पायऱ्या उतरताना, धावताना, कपडे घालताना किंवा कुठलंही काम करताना. अनेकदा तर वाचता-वाचता तो खालीही पडतो.

लोकांना हा व्हिडिओ खूपच भावला आहे. आतापर्यंत 26 हजारहून जास्त वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे.

First published:

Tags: Twitter, Upsc exam, Viral video.