Home /News /viral /

सावधान! Lockdownमध्ये घराबाहेर फिरण्याचा विचार करताय? आधी हा VIDEO पाहा, पोलीस काय करतायेत हाल...

सावधान! Lockdownमध्ये घराबाहेर फिरण्याचा विचार करताय? आधी हा VIDEO पाहा, पोलीस काय करतायेत हाल...

काही लोक कारण नसताना रस्त्यावर फिरत आहेत. यावर आता पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे.

  भोपाळ, 25 एप्रिल : कोरोना संसर्गाची वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशभरात हाहाकार माजला आहे. कोरोना व्हायरस संसर्गाचे सर्वाधिक रुग्ण (Coronavirus) मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) सापडत आहेत. अशात शिवराज सरकारने राज्यात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या दरम्यान काही लोक कारण नसताना रस्त्यावर फिरत आहेत. यावर आता पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. लॉकडाऊनचं पालन न करणाऱ्यांना पोलीस भररस्त्यात उठा-बशा काढण्याची शिक्षा देत आहेत. मध्यप्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात पोलिसांनी कारण नसताना रस्त्यांवर फिरणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी नवा उपाय सुचविला आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्ग पसरत आहे. प्रशासनाने कर्फ्यू लावला आहे. मात्र तरीही तरुण आणि सर्वसामान्य जनता कारणाशिवाय शहरात फिरत असताना दिसत आहे. यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस टोळ्यांमध्ये बाजारात फिरत आहेत. यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस लोकांची समजूत काढून त्यांना घरी पाठवत आहे. सायंकाळी जिल्ह्याच्या बीपीएल चौकात आणि शहरातील महाराणा प्रताप बस स्टँडवर पोलीस लोकांची चौकशी करीत आहे. यादरम्यान मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग रस्त्यांवर फिरता दिसत आहे. यांना पोलीस भररस्त्यात उठा-बशा काढायला सांगतात. अनेकांना तर बेडूकउड्याही मारायला सांगतात. हे ही वाचा-Oxygenचा तुटवडा होणार कमी, PM CARES फंडातून मोदी सरकार सुरू करणार 551 प्लांट जिल्ह्यात कलम 144 लागू दरम्यान जिल्ह्यात सीआरपीसी कलम 144 लागू करण्यात आला आहे. देशातील अन्य भागात आवश्यक सेवा सोडून पूर्ण लॉकडाऊन केला जात आहे. जोपर्यंत हे आवश्यक आहे आणि हे देखील सांगितले आहे की, कोरोना नियमांचं पालन न करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल.
  कोरोना रुग्णात वाढ मध्य प्रदेशातील कोरोना संसर्गाची प्रकरण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासात येथे कोरोना रुग्णांची संख्या 12,919 पर्यंत पोहोचली आहे. आरोग्य विभागाच्या आकड्यांनुसार कोरोना संसर्गातून 11091 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Lockdown, Madhya pradesh, Viral video.

  पुढील बातम्या