मराठी बातम्या /बातम्या /Viral /

चोरीची विचित्र घटना; भामट्याने लंपास केली अशी वस्तू की पोलिसांसह सरकारही हैराण

चोरीची विचित्र घटना; भामट्याने लंपास केली अशी वस्तू की पोलिसांसह सरकारही हैराण

चोरीची ही अजब घटना (Weird Incident of Theft) समोर आल्यानंतर त्या देशातील सरकार आणि पोलीस प्रशासनही थक्क झालं

चोरीची ही अजब घटना (Weird Incident of Theft) समोर आल्यानंतर त्या देशातील सरकार आणि पोलीस प्रशासनही थक्क झालं

चोरीची ही अजब घटना (Weird Incident of Theft) समोर आल्यानंतर त्या देशातील सरकार आणि पोलीस प्रशासनही थक्क झालं

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 22 डिसेंबर : आपण आपल्या आसपास चोरीच्या अनेक घटना पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला चोरीची एक अशी घटना सांगणार आहोत, जी वाचून तुम्हीही हैराण व्हाल. चोरीची ही अजब घटना (Weird Incident of Theft) समोर आल्यानंतर त्या देशातील सरकार आणि पोलीस प्रशासनही थक्क झालं. ही घटना अमेरिकेच्या ओहियो शहरातील आहे. चाकू हल्ल्यापासून संरक्षण करणार टी-शर्ट! शरिरावर होणार नाही जखम, असा खरेदी करा इथे चोरांनी काही छोटं-मोठं सामान किंवा पैसे नाही तर एक संपूर्ण ब्रिजच चोरी केला (Thieves Stole Bridge). या अनोख्या चोरीबद्दल ऐकून सगळेच हैराण झाले. सहसा चोर चोरी करायला येतात तेव्हा असं काहीतरी चोरी करतात, जे सहज कोणाच्या नजरेत येणार नाही आणि सहज घेऊन जाता येईल. बहुतेक चोर पैसे किंवा दागिने चोरण्याचा प्रयत्न करतात. अमेरिकेच्या ओहियो शहरात मात्र चोरांनी 58 फूट लांबीचा पुल चोरूनन जणू पोलिसांनाच चॅलेंज दिलं. हैराण करणारी बाब म्हणजे चोर 58 फूट लांब पुल चोरी करून घेऊन गेले आणि कोणाला याची भनकही लागली नाही. ही घटना समोर येताच पोलीस विभागातील अधिकारीही हैराण झाले. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, की त्यांनी आजपर्यंत अशी चोरी पाहिली नाही, ज्यात चोर संपूर्ण पुलच चोरी करून गेले आहेत.

पत्रकारांशी बोलत होत्या आरोग्यमंत्री, तेवढ्याच पायावर चढली ‘मकडी’; आणि मग...

चोरांनी ईस्ट अक्रोनच्या येथील कालव्यावरील पुलाची चोरी केली आहे. या पुलाचा वापर लोक कालव्यावरुन दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी करत असत. सध्या हा पुल डॅमेज असल्याने दुरुस्तीसाठी काढून दुसऱ्या जागेवर ठेवण्यात आला होता. इथूनच चोरांनी हा पुल चोरी केला. या पुलाची किंमत 30 लाख रुपये सांगितली जात आहे. पोलिसांनी सांगितलं की पुल चोरी करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
First published:

Tags: Theft, Theif

पुढील बातम्या