ब्रिस्बेन, 21 डिसेंबर: देशाच्या आरोग्यमंत्री (Health Minister) एका कार्यक्रमात जाहीर भाषण (Speech) करत असताना अचानक त्यांच्या पायापाशी (Spider) एक मकडी (कोष्टी) आली. विषारी मकडी पाहून साधारणतः कुणीही पळ काढला असता. मात्र क्विन्सलँडच्या आरोग्यमंत्र्यांनी त्याही परिस्थितीत प्रसंगावधान राखत शांत राहण्याची किमया साधली. आपल्याला शांत राहताना किती मानसिक प्रयत्न करावे लागत आहेत, हेदेखील त्यांनी प्रेक्षकांना सांगितलं, मात्र या कठीण परिस्थितीत त्याचं प्रसंगावधान चांगलंच खुलून आलं.
.@YvetteDAth has been spooked by a spider at this morning's COVID-19 update in Brisbane. The Health Minister briefly stopped the press conference until the huntsman scurried away. https://t.co/VZ3A1cpmr5 #qldpol #COVID19 #7NEWS pic.twitter.com/YlKfB9mq3m
— 7NEWS Brisbane (@7NewsBrisbane) December 16, 2021
पायापाशी दिसली मकडी
ब्रिस्बेनच्या आरोग्यमंत्री यीवेट डाथ या एका पत्रकार परिषदेला संबोधित करत होत्या. त्याचवेळी एका विषारी मकडी त्यांच्या दिशेनं येत असल्याचं एका पत्रकारानं पाहिलं. पत्रकारानं ते दाखवल्यानंतर यीवेट यांनी ती मकडी बाजूला करण्याची विनंती केली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी तिकडे धाव घेतली.
पायावर लागली चढू
पोडियमवर उभं राहून भाषण करणाऱ्या आरोग्यमंत्री या व्हिडिओत दिसतात. मकडी त्यांच्या पायापाशी आली असता त्यांचं लक्ष विचलित होतं. त्यांच्याशेजारी एक दुभाषक उभा आहे, जो मूकबधिरांच्या भाषेत त्यांचं भाषण अनुवादित करत आहे. मकडी जवळ आल्याचं पाहून त्या म्हणतात, बघा, मी किती शांत राहू शकते. मला मकडी अजिबात आवडत नाही, मात्र तरीही मी शांत आहे. मी शांतच राहिन आणि बोलतच राहिन आणि असा विचार करत राहिन की मकडी माझ्यापाशी आलीच नाही. मात्र जर का ती खरंच आली, तर मात्र मला सांगा. त्यांच्या या वाक्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो.
हे वाचा-जगातील पहिल्या मोबाईल SMS चा 2 कोटींना लिलावाची शक्यता, काय होता पहिला मेसेज?
मंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ
मंत्र्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात पहिल्यांदा मकडी गेल्याचं त्यांना वाटतं आणि त्यानंतर पुन्हा ती दिसते. तेव्हा एक अस्फूट किंकाळी त्यांच्या तोंडून बाहेर पडते. प्रेस कॉन्फरन्समध्ये कुठल्याही मकडीला नुकसान पोहोचवलं नाही, हे मात्र त्या आवर्जून सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Viral video.