नवी दिल्ली 16 मार्च : आपण बाजारात किंवा गर्दीच्या ठिकाणी असतो, तेव्हा चोर कधी, कसे, कुठून येतील हे सांगता येत नाही. चोर अगदी डोकं वापरून तुम्हाला कळूही न देता कधी तुमच्याजवळचं सामान किंवा पैसे लंपास करतील, हेदेखील अनेकदा कळत नाही. मात्र काही लोक असे असतात ज्यांना आधीच या घटनांची चाहूल लागते आणि ते सतर्क होतात. असंच काहीसं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं (Theft Shocking Video Viral). यात दिसतं की मार्केटमध्ये असलेल्या एका कॅफेमध्ये बसलेल्या महिलेसोबत दुर्घटना होणार असते. तिला या गोष्टीची अजिबातही चाहूल नव्हती. ती आपल्या लॅपटॉपमध्ये बराच वेळापासून व्यस्त होती. मात्र अचानक एका चोराने येत असं काही केलं की तिला धक्काच बसला. VIDEO - समोर खतरनाक प्राणी आला, पळायचं सोडून व्यक्ती गिटार वाजवत राहिली आणि… सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की कॅफेमध्ये बसलेली महिला आपल्या लॅपटॉपमध्ये काहीतरी काम करत असते. आसपास बसलेले लोक आपसात बोलत असतात. इतक्यात बाहेरून एक व्यक्ती हेल्मेट आणि कॅरी बॅग घेऊन कॅफेत येतो. लॅपटॉपमध्ये काम करणारी महिला त्याच्याकडे बघत नाही, मात्र काहीच सेकंदात असं काही होतं की महिला शॉक होते.
चोरी करण्यासाठी कॅफेमध्ये शिरलेला हा व्यक्ती महिलेचा लॅपटॉप हिसकावून घेतो आणि मग बाहेर धावू लागतो. मात्र ही तरुणीही सतर्कता दाखवते आणि लगेचच लॅपटॉपला लावण्यात आलेल्या चार्जरची वायर ओढते. VIDEO - भयंकर अपघातात ‘मृत्यू’ स्पर्शही करू शकला नाही; सुरक्षाकवचामुळे चमत्कार चोराने लॅपटॉप व्यवस्थित पकडलेला नसतो, त्यामुळे वायर ओढताच तो त्याच्या हातातून सुटतो. यानंतर तरुणी आपला लॅपटॉप परत घेते. लॅपटॉप चोरी करण्यासाठी आलेला व्यक्ती पुन्हा कॅफेमध्ये शिरतो. यादरम्यान कॅफेत असलेले इतर लोकही सतर्क होतात आणि चोरावर हल्ला करण्यासाठी खुर्ची उचलतात. अखेर या चोराला तिथून रिकाम्या हातीच पळ काढावा लागतो. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ट्विटरवर हा व्हिडिओ @ViciousVideos नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत 41 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.