मुंबई, 15 मार्च : वाघ, सिंह, बिबट्या, कोल्हा असे हिंस्र, खतरनाक, जंगली प्राणी आपल्यासमोर आले तर सर्वात आधी आपण काय करू… साहजिकच आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळून जाऊ. पण सध्या अशा एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जी असा प्राणी समोर आली तरी त्याच्यापासून दूर पळण्याऐवजी त्याच्यासमोर तशीच उभी राहिली. इतकंच नव्हे तर त्या प्राण्यासमोर उभी राहून गिटार वाजवू गाणंही गाऊ लागली (Man Playing Guitar For Fox). या व्यक्तीसमोर कोल्हा आला होता. जो माणसांवर भयानक हल्ला करून त्यांना अवघ्या काही क्षणात आपली शिकार बनवतो. अशा कोल्ह्यासमोर ही व्यक्ती छाती ताणून उभी राहिली. स्वतःचा जीव वाचवण्याऐवजी त्या कोल्ह्याला आपल्या हातातील गिटारची धून आणि गाणं ऐकवू लागली. _thornpipe_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ एका बर्फाळ प्रदेशातील आहे. व्हिडीओत पाहू शकता व्यक्ती आणि कोल्हा आमनेसामने आहे. त्या दोघांमध्ये अवघं काही अंतरच आहे. कोल्हा व्यक्तीची शिकार कऱण्याच्या उद्देशानेच आला आहे हे त्याच्या चेहऱ्यावरून दिसून येतं. व्यक्तीही तशी कोल्ह्याला पाहून थोडी घाबरली आहे, त्यामुळे त्याच्यापासून सावधच आहे. हे वाचा - उडता उडता एका पक्ष्याचा दुसऱ्या पक्ष्यावर हल्ला; आकाशातील शिकारीचा थरारक VIDEO कोल्ह्याची भीती वाटत असली तरी त्याच्यासमोर गिटात वाजवत गाण्याची हौसही या व्यक्तीने पूर्ण केली. जशी ही व्यक्ती गिटार वाजवू लागली. तसा कोल्हा त्याच्यासमोर शांत उभा राहिला. थोडा वेळ तो इथंतिथं फिरताना दिसला. त्यानंतर हळूहळू तो या व्यक्तीच्या खूप जवळ आला.
व्यक्ती सलग त्या कोल्ह्याकडे पाहत राहत नाही पण आपलं गाणं मात्र सुरूच ठेवतो. जशी कोल्ह्यावरून व्यक्तीची नजर हटत होती, तसा कोल्हा त्याच्या अधिक जवळ येत गेला. व्यक्तीचा व्हिडीओ बनवणाऱ्याने त्याला कोल्हा कुठे आहे, याची माहिती दिली. त्यामुळे कोल्हा जवळ येताच ही व्यक्ती काही पावलं मागे जातानाही दिसते. हे वाचा - सिंहाची शिकार करून जवळच बसलेले 2 शिकारी; पण मागून मृत्यू आला अन्…, थरारक VIDEO व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. धक्कादायक म्हणजे हा व्हिडीओ शूट करताना या व्यक्तीसोबत त्याचं लहान मूलही होतं, अशी माहिती या पोस्टमध्ये देण्यात आली आहे. स्वतःसोबत आपल्या मुलाचाही जीव त्याने धोक्यात घातला. इतक्या जवळ असूनही कोल्ह्याने माणसांवर हल्ला केला नाही.