मुंबई, 25 एप्रिल : रणरणत्या उन्हात तुम्ही एखाद्या रस्त्यावरुन चालले असाल. घसा कोरडा (Dry throat) पडला असेल तर, तुम्हाला कसली आठवण येते? घशाला कोरड पडल्यावर उन्हाळ्यात पाणी प्यावसं वाटतंच. पण, त्याबरोबर थंडगार सरबत (Cold Drink) किंवा मग ऊसाचा रस (Sugarcane juice) प्यावा असं वाटतंच. ऊसाचा रस पिण्याचे फायदे (Benefits of drinking sugarcane juice) आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. रस्त्यावरुन जाताना रसवंती गृहातल्या घुगरांचा आवाज आला की आपसूक आपली पावलं त्याकडे वळतात.
उन्हाळ्यात रसवंती गृहातच नाही तर, रस्त्यावर लाकडी गुऱ्हाळावरही रस पिण्यासाठी सगळेजण गर्दी करतात. कोल्ड्रींक पेक्षा ऊसाच्या रसाची किंमत कमीच असते. त्यामुळे जाहिरातीची गरज पडत नाही. मात्र आता कॉम्पिटीशन वाढलं आहे. त्यामुळे अशात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बरेचजण घरपोच सेवाही देतात.
(हे वाचा-व्यसनाला पर्याय नाही! Ventilatorवर असणाऱ्या रुग्णाचा तंबाखू मळतानाचा VIDEO VIRAL)
व्यवसायातील याच स्पर्धेचा विचार करुन काही पठ्ठ्यांनी ऊसाच्या रसाची जाहिरात करायचं ठरवलं. बरं या पठ्ठ्यांनी केवळ जाहिरात नाही तर थेट रॅप सॉँग (Rap Song) बनवलं आहे. ‘पांडबाच्या रानातला ऊसाचा रस’ असं हे गाण आहे. सिंगर लुईस पॉन्सी आणि डॅडी यांकी याच्या ‘डेस्पसीतो’ या गाण्याच्या चालीवर या तरुणांनी रॅप सॉंग बनवलं आहे. खासरे म्युझिकचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे.
गाण्याची सुरवात अगदी गावरान भाषेत होते. लई बेकार उन पडलंय म्हणत पोरं रसाची किंमत 10 रुपये आहे सांगतात. सोबत गुऱ्हाळाचे मालक पांडबाही या गाण्यात एका मॉडेल प्रमाणे गॉगल नीट करत एन्ट्री घेताना दिसत आहेत. सोबत रसाने भरलेले ग्लास दिसतात. अगदी प्रोफेशनल पण तितकीच मजेदार जाहीरात/रॅप साँग या तरुणांनी तयार केलं आहे. या तरुणांचं याआधी चहावर देखील एक गाणं व्हायरल झालं होतं. पण या ऊसाच्या रॅप साँगला विशेष प्रसिद्धी मिळते आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Summer, Summer hot, Summer season, Youtube, Youtubers