मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Viral Video: ...जेव्हा माकडाला येतो राग; मग असं फोटोसेशन करणं जाल कायमचे विसरून

Viral Video: ...जेव्हा माकडाला येतो राग; मग असं फोटोसेशन करणं जाल कायमचे विसरून

माकडासोबत सेल्फी घेणं महागात

माकडासोबत सेल्फी घेणं महागात

माकडांना कधीकधी गोंजारण, त्यांच्यासोबत फोटो सेशन करणं धोकादायक ठरू शकतं. कोणी त्यांच्या इच्छेविरुद्ध कोणतेही काम केले तर काहीवेळा ते रागाने काहीही करतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : माकडं अनेकदा मजेदार हरकती करत असतात ते पाहुन अनेकांना गंमत वाटते. पण कधीकधी त्यांना गोंजारण, त्यांच्यासोबत फोटो सेशन करणं धोकादायक ठरू शकतं. कोणी त्यांच्या इच्छेविरुद्ध कोणतेही काम केले तर काहीवेळा ते रागाने काहीही करतात. अशावेळी तुम्ही त्यांच्या रागाची कल्पनाही करू शकत नाही. कधीकधी माकड खूप आरामात बसलेले दिसते आणि अचानक हल्ला करते. असेच काहीसे एका व्यक्तीसोबत घडले, तो माकडासोबत फोटोसाठी पोझ देत होता, तेव्हा माकडाने त्याच्यावर अचानक हल्ला (monkey bit the person while taking the photo) केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ videolucu.funny नावाच्या पेजवरून इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस उभा आहे आणि त्याच्या शेजारी एक माकड बसलेले आहे. एक माणूस माकडासह फोटोसाठी पोझ देत आहे. त्यावेळी एकजण त्याला मागून हात लावतो, मग माकडाची नजर त्याच्यावर पडते आणि हे पाहून त्याला राग येतो आणि त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीवर हल्ला करतो.

हे वाचा - दारू पिऊन रस्त्यावर चालत राहिले; फिरता फिरता नशेत थेट फॉरेनला पोहोचलं कपल

हा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे आणि लोक व्हिडिओ पाहून हसून लोटपोट होत आहेत. तर काहींनी अरे देवा असं म्हटलं आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 4 हजार पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला हे देखील समजले असेल की प्राणी कितीही माणसाळला असला तरी त्याच्यापासून नेहमी सावध राहिले पाहिजे.

First published:

Tags: Funny video, Video Viral On Social Media