नवी दिल्ली, 27 जानेवारी : सिंहाला आपण जंगलाचा राजा म्हणतो. ज्याला पाहून किंबहुना त्याची फक्त डरकाळी ऐकून संपूर्ण जंगलातील सर्व प्राणी कसे थरथर कापतात, हे तुम्ही कधीतरी ऐकलंच असेल. पण जंगलाचा राजा असणाऱ्या हाच सिंह डरकाळी कशी फोडतात, हेच विसरला तर? तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? प्रत्यक्षात मात्र एका सिंहाच्या बाबतीत हे घडलं आहे.
सिंहाची डरकाळी ऐकून माणसांबरोबरच इतर वन्य प्राण्यांचाही थरकाप उडतो. पण तीच डरकाळी कशी देतात, हे सिंह विसरला तर काय होईल, याची कल्पना करा. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. एक सिंह डरकाळी कशी देतात, हेच विसरलाय. याचा परिणाम त्याच्या प्रकृतीवरही झालाय. आता या सिंहाला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
डेली स्टारच्या वृत्तानुसार, या सिंहाचं नाव रुबेन आहे. आर्मेनियन-अझरबैजानी सीमेवर बांधलेल्या प्राणीसंग्रहालयात रुबेन होता. तेथे गेल्या पाच वर्षांपासून तो एका पिंजऱ्यात बंद होता. या प्राणीसंग्रहालयाचा मालक रशियन होता. मालकाच्या मृत्यूनंतर प्राणीसंग्रहालय बंद झाले. त्यानंतर रुबेनला पिंजऱ्यातून काढून इतर सिंहासोबत सोडण्यात आलं. पण तेव्हा त्याला डरकाळी देता येत नसल्याचं समोर आलं. तो डरकाळी ऐवजी तोंडातून केवळ कर्कश आवाज काढत होता.
दक्षिण आफ्रिकेत नेलं जाणार
खरं तर, प्राणीसंग्रहालय बंद झाल्यामुळे व रुबेनची पिंजऱ्यातून सुटका झाल्यामुळे प्राणीसंग्रहालयाच्या मालकाच्या कुटुंबाला आनंद झाला होता. या सिंहाला सुरक्षित ठिकाणी हलवण्याची मोहीम गुप्त ठेवण्यात आली होती. युद्धग्रस्त प्रदेशात वाढणाऱ्या तणावामुळे त्यासाठी काळजीपूर्वक नियोजन करण्यात आलं होतं. आता रुबेनला लवकरात लवकर दक्षिण आफ्रिकेत नेलं जाईल, तिथे त्याच्यावर उपचार केले जातील, असं सांगण्यात येतंय. रुबेनला न्यूरॉलॉजिकल समस्या आहे. त्याच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाल्याचा अंदाज आहे. कारण, जेव्हा तो चालतो तेव्हा त्याचा तोल जातो. त्याला डरकाळी देणेही शिकवलं जाणार आहे.
जन्म दाखल्यावर कुत्र्याच्या पिल्लाची सही; पंजांचे ठसे उमटवणाऱ्या पिल्लाचा Video Viral
सिंहाचा जीव वाचणं होतं कठीण
जन क्रेमर नावाच्या वन्यजीव अभयारण्य अधिकाऱ्यानं सांगितलं की, ‘प्राणीसंग्रहालयातील इतर सर्व प्राण्यांना मालकाच्या मृत्यूनंतर वाचवण्यात आलं, व त्यांचे स्थलांतरण करण्यात आलं. परंतु तेव्हा रुबेनसाठी जागा नव्हती. कारण सिंह कळपामध्ये राहतात व डरकाळी देऊन एकमेकांशी बोलतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, रुबेन हा पिंजऱ्यात असल्यामुळे गेल्या काही काळापासून त्याच्या पाठीवर सूर्याचा प्रकाशही पडला नव्हता. रुबेन सुमारे 15 वर्षांचा आहे, आणि दुर्लक्ष केल्यामुळे त्याचे केस, दात खराब झालेत. त्याला न्यूरोलॉजिकल आजार झालाय. रुबेनला अशा स्थितीत सोडण्यात आलं होतं, ज्यातून त्याला जीव वाचणं कठीण होतं, परंतु तो अखेरीस वाचला.’
दरम्यान, सिंहाची डरकाळी ऐकल्यानंतर भलेभले घाबरतात. परंतु रुबेन हा सिंह डरकाळी देण्याचं विसरला असून त्यानं पुन्हा डरकाळी द्यावी, यासाठी प्राणीमित्र प्रयत्नशील आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lion, Videos viral