मुंबई 25 जानेवारी : जन्मदाखल्यावर कधी स्वतःची सही असते का? खरं तर याचं उत्तर नकारार्थीच आहे; पण कुत्र्याच्या एका पिल्लाने स्वतःची सही म्हणून आपल्या पंजांचे ठसे जन्मदाखल्यावर उमटवले आहेत. छोट्याशा पिल्लाच्या पायांचे इवलेसे ठसे खूपच मोहक आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होतोय. लहान बाळं आणि पाळीव प्राणी यांच्या हालचाली पाहणं मनोरंजक असतं. बऱ्याचदा त्या अतार्किक असतात. काही व्हिडिओ एडिट करूनही तयार केलेले असतात; मात्र तरीही लोकांना ते पाहायला आवडतात. सोशल मीडियावर असे व्हिडिओ खूप जास्त लोकप्रिय होतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यात कुत्र्याचं नुकतंच जन्मलेलं एक पिल्लू मालकाच्या साह्यानं जन्मदाखल्यावर सही म्हणून स्वतःच्या पंजांते ठसे उमटवतंय. हे ही पाहा : वेगळ्या पद्धतीची चहा पिण्याच्या नादात असा फसला तरुण, आता स्वप्नात सुद्धा थरथर कापेल, पाहा Video हा व्हिडीओ LadBible ने इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, त्याला 45 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच 2 लाख 60 हजारांहून अधिक लाइक्स या व्हिडिओला मिळाले आहेत. जन्मदाखल्यावर त्या कुत्र्याच्या पिल्लाचं नाव, जात, जन्मतारीख व आई-वडिलांचं नावही लिहिलेलं आहे. त्या पिल्लाचं नाव अॅलेक्स असं ठेवण्यात आलंय. त्याच दाखल्यावर ते पिल्लू त्याच्या छोट्याशा पंजांचे ठसे उमटवत असल्याचं व्हिडिओत दिसतंय. निळ्या शाईनं उमटलेले ते इवलेसे ठसे खरोखरच खूप मोहक आहेत. मालकानं दोन्ही हातांनी त्याचे छोटेसे पंजे पकडून त्याचे ठसे कागदावर उमटवलेले व्हिडिओत दिसतात. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. क्यूट, प्यारा अशी विशेषणं तर जागोजागी दिसतात. काहींनी हा व्हिडिओ पाहून दिवसाची सुरुवात चांगली झाल्याचं म्हटलंय, तर काहींनी इतका सुंदर व्हिडिओ पाठवल्याबद्दल आभार मानलेत.
कुत्र्याच्या त्या छोट्याशा पिल्लाच्या पावलांचे ठसे खूपच मनमोहक दिसत असल्यानं त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. काहींनी मात्र स्वतःच्या जन्मदाखल्यावर स्वतःची सही कशी असू शकते, असा प्रश्न उपस्थित केलाय. लहान बाळांची सही कधीच जन्मदाखल्यावर नसते, मग कुत्र्याच्या पिल्लाची कशी असं म्हणत काहींनी त्यावर नाराजीची प्रतिक्रियाही दिलीय. काहींनी तर ‘लाइक्स मिळवण्यासाठी केलेले उद्योग’ असंही या व्हिडिओबाबत म्हटलंय. लहान मुलं किंवा प्राण्यांच्या जगात मन रमतं. ताण कमी करण्यासाठीही असे व्हिडिओ पाहणं फायदेशीर ठरतं. त्यामुळेच सोशल मीडियावर असे व्हिडिओ जास्त व्हायरल होतात. त्यांना लोकप्रियताही भरपूर मिळते. या व्हिडिओलाही नेटिझन्सनी खूप लाइक्स दिले आहेत.

)







