कोलकाता, 20 जून : पश्चिम बंगालच्या (West Bengal News) वर्धमान जिल्ह्यात एका तरुणाच्या सर्जरीदरम्यान डॉक्टरांनी असं काही पाहिलं की ते हैराण झाले. या व्यक्तीच्या पोटातून 250 खिळे, 35 नाणी आणि स्टोन चिप्स आढळले. मानसिक विकृत असलेला हा तरुण गेल्या 15 वर्षांपासून खिळे खात होता. वर्धमान मेडिकल कॉलेज अँड रुग्णालयातील डॉक्टरांनी सर्जरीकडून या सर्व वस्तू काढल्या. आता त्या व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचं नाव शेख मोइनुद्दीन आहे. तो मंगलकोट भागातील राहणारा आहे. तो गेल्या शनिवारपासून जेवत नव्हता. तीव्र पोटदुखी सुरू असल्यामुळे त्याला वर्धमानातील एका खासगी रुग्णालयात आणण्यात आलं. येथे एक्सरे केल्यानंतर डॉक्टरही हादरले. खासगी डॉक्टरांनी सांगितलं की, सर्जरीसाठी लाखो पैसे खर्च होती. त्यानंतर कुटुंबाने तरुणाला वर्धमान मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केलं. येथे रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी त्याच्या सर्जरीसाठी एका वेगळ्या मेडिकल टीमचं गठण केलं. यानंतर डॉक्टरांनी त्याच्या पोटातून 250 खिळे, 35 नाणी आणि अनेक दगड सापडले. रुग्ण हा मनोरुग्ण असल्याकारणाने त्यातून तो अशा वस्तू खात असावा, असं सांगितलं जात आहे. तरुणाच्या भावाने सांगितलं की, त्याचा भाऊ मनोरुग्ण आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वीपणे त्याचं ऑपरेशन केलं, यामुळे त्याने रुग्णालयातील सर्व डॉक्टरांचे आभार मानले. गेल्या 15 ते 16 वर्षांपासून मोइनुद्दीन मानसिक आजाराचा सामना करीत आहे. गेल्या शनिवारपासून त्याने खाणं-पिणं बंद केलं होतं. त्याला तीव्र पोटदुखी होत होती. म्हणून त्याला रुग्णालयात हलवण्यात आलं. येथे डॉक्टरांनी एक्सरे केला. तो रिपोर्ट पाहून डॉक्टरही हादरले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.